Rohit Sharma T20 World Cup : भारताने वनडे वर्ल्डकपची फायनल हरल्यानंतर आता सर्वांना 2024 च्या जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. भारतीय संघव्यवस्थापन देखील यासाठी संघ बांधणी करण्याच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, बीसीसीआयने या विषयासंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली. त्यात कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती सदस्य यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा झाली.
वनडे वर्ल्डकपनंतर टी 20 वर्ल्डकपसाठी काय ठरवलं आहे. रोडमॅप काय याबाबत जय शहा, राजीव शुक्ला आणि आशिष शेलार याबाबत जाणून घेत होते. नुकतेच दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील वनडे, टी 20 आणि कसोटी संघाची घोषणा झाली.
बीसीसीआयच्या दिल्लीत झालेल्या या बैठकीला रोहित शर्मा झूम कॉलवरून उपस्थित होता. त्याने बीसीसीआय अधिकाऱ्यांना आणि निवडसमितीला, ते वेस्ट इंडीजमध्ये होणार्या टी 20 वर्ल्डकपसाठी त्याचा विचार करत आहेत का नाही हे थेटच विचारलं. याबाबतची माहिती बैठकीला उपस्थित असणाऱ्या बीसीसीआय अधिकाऱ्यानेच सांगितल्याचे वृत्त दैनिक जागरणनने दिले आहे.
रोहितने उपस्थित अधिकारी आणि अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमितीला विचारले की, 'जर तुम्ही मला टी 20 वर्ल्डकपसाठी निवडणार असाल तर ते आताच सांगा, त्याबाबत कसं पुढं जायचं तेही आताच सांगा.'
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती सदस्यांचे रोहितच्याच नेतृत्वाखाली भारताने टी 20 वर्ल्डकप खेळावा याबाबत एकमत झाले आहे. निवडसमिती तर रोहितने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील टी 20 मालिकेत देखील भारताचे नेतृत्व करावे असे वाटत होते. मात्र रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून थोडा ब्रेक मिळावा अशी विनंती केली होती.
त्यानंतर निवडसमितीने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांच्या टी 20 आणि तेवढ्याच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ निवडला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.