Rohit Sharma Virat Kohli Hardik Pandya will not play asian games 2023 sakal
क्रीडा

Team India : रोहित, विराट अन् पांड्या 'या' मोठ्या स्पर्धेतून बाहेर, BCCIने दिले संकेत

Kiran Mahanavar

Asian Games 2023 : बीसीसीआयने शनिवारी सकाळी एक निवेदन जारी केले. यामध्ये मंडळाने अनेक घोषणा केल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोलंदाजांना दोन बाऊन्सर टाकता येणार, यासोबतच देशातील प्रमुख क्रिकेट स्टेडियमचेही अपग्रेडेशन करणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आणखी एका स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही बीसीसीआयने सांगितले. पुरुषांसोबतच भारताचा महिला संघही यात सहभागी होणार आहे.

टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धेतमध्ये खेळणार

भारताचा महिला आणि पुरुष क्रिकेट संघ 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार आहे. 2010 आणि 2014 मध्ये आशियाई खेळांमध्येही क्रिकेटचा भाग होता. मात्र भारताने त्यात सहभाग घेतला नाही. यावेळी खेळांचे यजमानपद चीनमधील हांगझोऊ शहराजवळ आहे. 23 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. 8 ऑक्टोबर रोजी समारोप समारंभ होणार आहे. क्रिकेटचा अंतिम सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे.

रोहित-विराटसारखी मोठी नावे नाहीत खेळणार

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे मोठे भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे - आशियाई खेळांचे वेळापत्रक विश्वचषक 2023 च्या ओव्हरलॅपमुळे, विश्वचषक स्पर्धेत सहभागी न झालेल्या खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी निवड केली जाईल.

5 ऑक्टोबरपासून भारताच्या यजमानपदावर विश्वचषक खेळवला जाणार आहे. यासोबत सराव सामने आठवडाभर आधी सुरू होतील. अशा स्थितीत भारतीय संघाला आपली बेंच स्ट्रेंथ चीनला पाठवावी लागणार आहे. पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातही अशीच परिस्थिती असेल. त्यांचे प्रमुख खेळाडूही विश्वचषकासाठी भारतात असतील.

टी-20 फॉरमॅटमध्ये होणार सामने

आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-20 फॉरमॅटमध्ये सामने खेळवले जातील. त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जाही मिळेल. विश्वचषक स्पर्धेत केवळ 15 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या स्टार खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. संघाची कमान कोणाच्या हाती असेल, हाही मोठा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT