Rohit Sharma Virat Kohli  esakal
क्रीडा

T20 World Cup 2024 : विराट - रोहित टी 20 साठी उत्सुक; बीसीसीआयने निर्णय ढकलला पुढं?

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा या आठड्याच्या शेवटी संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानसोबत टी 20 मालिका खेळणार आहे. टी 20 वर्ल्डकप पूर्वी भारतीय संघ ही एकमेव टी 20 मालिका खेळेल. त्यानंतर भारतीय खेळाडू थेट आयपीएलमध्ये दिसतील. त्यामुळे संघ निश्चित करण्यासाठी भारतीय निवडसमितीच्या हातात एकच मालिका आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे निवडसमितीसाठी संघ निवड डोकेदुखी ठरणार आहे. विराट आणि रोहितने शेवटचा टी 20 सामना हा 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता.

भारतीय निवड समितीमधील दोन सदस्य सलिल अंकोला आणि शिव सुंदर दास हे दक्षिण आफ्रिकेत आहेत. ते दुसऱ्या कसोटीदरम्यान अजित आगरकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. हे सर्व प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशी देखील चर्चा करतील आणि मगच अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करतील असा अंदाज आहे.

जवळपास 30 टी 20 स्पेशलिस्ट भारतीय आणि आयपील स्टार खेळाडूंवर निवडसमितीचं लक्ष असणार आहे. यातूनच वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघ निवड करणार आहेत.

मात्र आगकरच्या अध्यक्षतेखालची निवडसमिती विराट आणि रोहितला निवडणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. अफगाणिस्तानविरूद्धची मालिका 11 जानेवारीपासून मोहालीत सुरू होणार आहे. विराट आणि रोहितने आपण टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे आधीच स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआय सूत्र काय म्हणतात?

बीसीसीआय सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दोघेही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे अफगाणिस्ताविरूद्धच्या मालिकेत कोणताही निर्णय होण्याची शक्यता नाही. टी 20 वर्ल्डकपबाबतचे सर्व निर्णय हे आयपीएलच्या पहिल्या महिन्यात घेण्यात येतील.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT