Yashasvi Yadav Rohit Sharma 
क्रीडा

Yashasvi Jaiswal Rohit Sharma : रोहित - यशस्वीने रचला इतिहास; वेस्ट इंडीजमध्ये यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Yadav Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी पहिल्या सत्रात विंडीजच्या गोलंदाजांना चांगलेच थकवले. पहिल्या सत्रात या दोघांनीही सावध फलंदाजी करत भागीदारी रचण्यावर भर दिला. (West Indies Vs India 1st Test Day 2 News)

यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) आपल्या पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतकी खेळी केली. यानंतर रोहितनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी बघता बघता शतकी आणि त्यानंतर 150 शतकी भागीदारी रचली.

यशस्वी आणि रोहितने लंचनंतर धावगती वाढवण्यास सुरूवात केली. दरम्यान या दोघांची भागीदारी 160 धावांच्या पार पोहचल्यानंतर इतिहास रचला गेला. यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी वेस्ट इंडीजमध्ये भारताकडून सर्वात मोठी सलामी भागीदारी रचली. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल हे पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीला आले आहेत. भारताला अनेक वर्षानंतर डावखुरा सलामीवीर मिळाला आहे.

दरम्यान, यशस्वी जैसवालने दुसऱ्या सत्रात आक्रमक फटके मारत आपली अर्धशतकी खेळी शतकी खेळीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. (Test Cricket Records)

दुसऱ्या बाजूने रोहित शर्माने देखील संथ फलंदाजी केली. यामुळे भारताची धावगती थोडी मंदावली होती. मात्र या दोघांनी धावांची गती वाढवण्यास सुरूवात करत आपली पहिल्या डावातील आघाडी वेगाने वाढवण्यास सुरूवात केली. ही जोडी आता जवळपास 4 च्या सरासरीने धावा करण्याचा प्रयत्न करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलं सोनिया परचुरेंना पत्र; म्हणाले- ही पोकळी कधीही...

IND vs NZ: 99 OUT! ऋषभ पंतचे शतक हुकल्याची खंत; पण, सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं

Diwali Festival 2024 : टिकाऊ, इको- फ्रेंडली आकाशकंदीलांना मागणी! बाजारपेठ सजली; किमतींमध्ये दहा टक्के वाढ

"भाई, IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?" चाहत्याच्या प्रश्नावर Rohit Sharma चे भन्नाट उत्तर, Video Viral

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

SCROLL FOR NEXT