Rohit Sharma WI vs IND 2nd Test  esakal
क्रीडा

Rohit Sharma : 6,6,6,4,4,4,4,4... विक्रमांचा रतीब! रोहित शर्माने यशस्वी सोबत रचला इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma WI vs IND 2nd Test : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर यशस्वी जैसवाल यांनी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरूवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालने अवघ्या 12 षटकात 98 धावांची सलामी देत विंडीजवरील आपली आघाडी वेगाने वाढवली.

रोहित शर्माने 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपली 57 धावांची खेळी पाच चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. रोहित शर्माचे हे कसोटीतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक होते. (Rohit Sharma Test Cricket Records)

याचबरोबर रोहितने वैयक्तिक आणि यशस्वी जैसवालसोबत अनेक विक्रम देखील प्रस्थापित केले. यशस्वी जैसवालसोबत रोहित शर्माने इतिहासच रचला.

रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालने भारताकडून कसोटीत सर्वात वेगाने अर्धशतकी भागीदारी रचली. यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा हे भारताकडून सलग तिसरी शतकी सलामी देणार असे वाटत असतानाच गॅब्रिएलने रोहितला 57 धावांवर बाद केले. त्यामुळे शतकी सलामी अवघ्या 2 धावांनी हुकली.

रोहित शर्माने अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. सलग दोन कसोटी डावात सर्वाधिकवेळा दुहेरी आकड्यात पोहचण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला. त्याने 2021 ते 23 या वर्षात 30 वेळा हा कारनामा केला आहे.

रोहित शर्माने वेस्ट इंडीजविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 103 धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 80 तर दुसऱ्या डावात 57 धावा केल्या. याचबरोबर रोहित शर्मा हा WTC इतिहासात भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Clock Symbol: 'तो' मजकूर ३६ तासात प्रसिद्ध करा, अजित पवार गटाला निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचे निर्देश

ऑस्ट्रेलिया BGT मध्ये भारताला लोळवेल! रोहितची टीम फक्त १ मॅच जिंकेल; वाचा कुणी केलाय हा दावा?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे IT शेअर्स तेजीत

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, संविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

SCROLL FOR NEXT