Roshibina Devi Naorem esakal
क्रीडा

Roshibina Devi Naorem : रोशिबिना देवीने पदक मणिपूरला केलं अर्पण; आई - वडील करत आहेत गावाची सुरक्षा

Roshibina Devi offered the medal to Manipur

अनिरुद्ध संकपाळ

Roshibina Devi Naorem :

मूळची मणिपूरची असलेली वुशू खेळाडू रोशिबिना देवी नाओरेमने चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2023 मध्ये महिला 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. गेल्या काही महिन्यांपासून पेटलेल्या मणिपूरसाठी ही एक चांगली वर्ता होती. रोशिबिनाने देखील आपले हे पदक मणिपूरला समर्पित केले.

रोशिबिनाने पदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "मी रौप्य पदक पटकावल्याबद्दल आनंदी आहे. मात्र मी सुवर्ण पदक जिंकू शकलो नाही याचेही दुःख आहे. मी माझे रौप्य पदक हे मणिपूरच्या लोकांना समर्पित करते. मी या सामन्यात माझे सर्वोत्तम देण्यााच प्रयत्न केला. मी या सामन्यातील ज्या चुका केल्या त्या पुढच्या सामन्यात सुधारण्याचा प्रयत्न करेन. मी पुढच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी जास्त कष्ट करेन.'

रोशिबिनाचे प्रशिक्षक कुलदीप हांडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'गेल्या वर्षी तिने कांस्य पदक जिंकले होते. तिची कामगिरी दमदार आहे. मात्र आम्हाला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. मात्र आम्ही थोडो कमी पडलो. आम्ही याच्यावर वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी काम करू. रोशिबिना तिथेही चांगली कामगिरी करेल.'

आई - वडील करत आहेत गावाची सुरक्षा

रोशिबिना ही मैतेई समुदायातील आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या काही महिन्यांपासून तणावाचा वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे तेथील गावकरीच आपल्या गावाची सुरक्षा करण्याची जबाबदारी उचलत आहेत.

रोशिबिनाचा छोटा भाऊ नाओरेम प्रियोजीत सिंह मणिपूरमधून बोलताना म्हणाला की, माझी आई मशाल वाहकाच्या रूपात सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे. वडील देखील गस्ती पथकात आहेत. रोशिबिनाने त्यांना गेल्या आठवड्यात फोन केला होता. मात्र त्यांनी तिला तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासा सांगितले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT