Morocco Defeat Spain Reached In Quarter Final  esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : सलग दुसऱ्या पेनाल्टी शूटआऊटवर मोठा अपसेट; स्पेनला हरवून मोरक्कोने इतिहास रचला

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 : मोरक्कोने स्पेनविरूद्धचा सामना पेनाल्टी शूटआऊटवर 3 - 0 असा जिंकत इतिहासात पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकपची क्वार्टर फायनल गाठली. आपल्या शिस्तबद्ध खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्पेनला मोरक्कोचा गोलपोस्ट पेनाल्टी शूटआऊटवर देखील भेदता आला नाही. त्यांचा गोलकिपर यासिन बोनोने त्याच्याकडे आलेला प्रत्येक फटका अडवला. विशेष म्हणजे फिफा वर्ल्डकप इतिहासात गेल्या सात वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा पेनाल्टी मारून सामना जिंकणारी मोरोक्को ही पहिली टीम ठरली आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 मधील राऊंड ऑफ 16 चा सलग दुसरा सामना हा पेनाल्टी शूटआऊटवर गेला. स्पेन आणि मोरोक्कोला सामन्याच्या 90 मिनिटात आणि एक्स्ट्रा टाईममध्ये देखील प्रतिस्पर्ध्याची गोलपोस्ट भेदता आली नाही. सामना पूर्णवेळ 0 - 0 बरोबरीत राहिला अखेर सामन्याच्या निकाल हा पेनाल्टी शूटआऊटवर झाला. 2010 ला वर्ल्डकप जिंकणाऱ्या स्पेनने मोरोक्कोवर पूर्णवेळ आणि एक्स्ट्रा टाईममध्ये मिळून 13 वेळा चढाई केली. मात्र त्यातील फक्त एकच शॉट ऑन टार्गेट होता. मोरोक्कोने स्पेनला आपल्या गोलपोस्टपासून संपूर्ण सामना दूर ठेवले.

पेनाल्टी शूटआऊटमध्ये प्रथम मोरोक्कोने पेनाल्टी मारली. सबिरीने मोरोक्कोचा पेनाल्टी शूटआऊटमधील पहिला गोल केला. त्यानंतर स्पेनच्या सराबियाने बॉल गोलपोस्टच्या खांबला मारला. त्यामुळे मोरोक्को 1 - 0 अशी आघाडीवर गेली. त्यानंतर मोरोक्कोच्या हकिम झियेचने दुसरी पेनाल्टी यशस्वी करत आघाडी 2 - 0 अशी नेली. त्यानंतर कार्लोस सोलेरने स्पेनकडून दुसरा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न बोनोने हाणून पाडला. तिसऱ्या प्रयत्नात मोरोक्को आणि स्पेन दोघांच्याही गोलकिपरनी पेनाल्टी सेव्ह केल्या गेल्या. अखेर मोरोक्कोच्या अचरफ हकिमीने चौथ्या प्रयत्नात गोलपोलस्टचा अचूक वेध घेत पेनाल्टी शूटआऊट 3 - 0 असा जिंकला. मोरोक्कोने इतिहास रचत पहिल्यांदाच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT