Sanju Samson Rajasthan Royals  esakal
क्रीडा

Sanju Samson : इमानदारी! तीन फ्रेंचायजी संजूला कर्णधार करणार होत्या, मात्र पठ्ठ्याने दिलं असं उत्तर की...

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson Rajasthan Royals : सोशल मीडियावर जितकी हाईप ही विराट कोहलीची किंवा एम.एस. धोनीची नाही तितकी हाईप ही संजू सॅमसनची आहे. भारतीय संघात कधी आत कधी बाहेर होत असलेल्या संजूसाठी ट्विटरवर ट्रेंड सुरू होतात. शशी थरूर सारखे देशातील वरिष्ठ राजकारणी देखील संजू साठी ट्विटरवर बॅटिंग करत असतात.

याच संजूबाबत राजस्थान रॉयल्सच्या ट्रेनरने एक खुलासा केला. हा खुलासा वाचून तुम्हाला नक्कीच संजू सॅमसनचा अभिमान वाटेल. संजू सॅमसन हा 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सशी पुन्हा एकदा जोडला गेला होता. तेव्हापासून तो राजस्थान रॉयल्स संघाचा नियमीत खेळाडू झाला.

राजस्थान रॉयल्सचे ट्रेनर राजामनी प्रभू यांना सांगितले की, संजूकडे मोठी आयपीएल फ्रेंचायजी जॉईन करण्याची संधी होती. मात्र त्याने राजस्थान रॉयल्ससोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

स्पोर्ट्स विकटनशी बोलताना प्रभू म्हणाले की, 'मी संजू सॅमसनला 2021 नंतर सांगितले होते. की तू आयपीएलच्या मोठ्या संघात जा. मात्र तो यावर म्हणाला की, मला राजस्थान रॉयल्सला मोठा संघ बनवायचं आहे. तो पुढे म्हणाला की, अश्विन, चहल, प्रसिद्ध सारखे खेळाडू संघात आणू. त्याच्याकडे दूरदृष्टी आहे.'

प्रभू म्हणाले की खुलासा केला की संजूला तीन फ्रेंचायजींकडून कर्णधारपदाची ऑफर होती. मात्र त्याने त्या ऑफर नाकारल्या. प्रभू म्हणाले की, '2022 च्या लिलावापूर्वी संजू सॅमसनला तीन फ्रेंचायजींकडून कर्णधारपदाची ऑफर होती. मात्र तो राजस्थान रॉयल्सची इमानदार असल्याने तो आरआर सोबतच राहिला. मी पैज लावून सांगतो ऑफर अशी होती की 99 टक्के खेळाडूंनी उडी मारली असती.'

राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनला 15 कोटी रूपये देते. प्रभू यांनी सांगितल्या प्रमाणे तो जवळपास 2 कोटी रूपये हे स्थानिक खेळाडूंना मदत करण्यासाठी खर्च करतोय.

प्रभू यांनी दावा केला की, 'संजू सॅमसनला एका हंगामाचे जवळपास 15 कोटी रूपये मिळतात. मला मिळालेल्या माहितीनुसार तो जवळापास 2 कोटी रूपये हे स्थानिक खेळाडू आणि गुणवत्ता असलेल्या मुलांवर खर्च करतोय. एक खेळाडू म्हणून आणि एक चांगला व्यक्ती म्हणून देखील संजू यशस्वी व्हावा असं सर्वांना वाटतं. त्यामुळेच त्याचा सोशल मीडियावर इतका मोठा फॅन फॉलोईंग आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT