केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावात गुंडाळला. दिवस अखेरपर्यंत भारताने दुसऱ्या डावात २ बाद ५७ धावा करत ७० धावांची आघाडी घेतली. दिवसचा खेळ संपला त्यावेळी विराट कोहली १४ धावांवर तर चेतेश्वर पुजारा ९ धावांवर नाबाद होते.
दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव १ बाद १७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. यात जसप्रीत बुमराह आघाडीवर होता. त्याने ४२ धावात ५ विकेट घेतल्या. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली. आफ्रिकेकडून पिटरसनने ७२ धावांची झुंजार खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा डाव २१० धावात गुंडाळात १३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर २४ धावांची भर घालून माघारी गेले. राहुल आणि मयांक बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दिवस अखेर ५७ धावा करत भारताची आघाडी ७० धावांपर्यंत पोहचवली.
विराट १४ तर पुजारा ९ धावा करुन नाबाद
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ५७ धावा. भारताकडे ७० धावांची आघाडी
24-2 : भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब, दोन्ही सलामीवीर माघारी
210 - 10 : बुमराहने पाचवी शिकार करत शेपूट गुंडाळली, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावात संपला. भारताकडे १३ धावांची आघाडी
200-9 : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली.
दक्षिण आफ्रिका अजूनही ५७ धावांनी पिछाडीवर
159-6 : मोहम्मद शमीचा एकाच षटकात डबल धमाका, बाऊमा २८ तर वेरने भोपळाही न फोडता माघारी
153-4 : दक्षिण आफ्रिकेने केला १५० चा टप्पा पार, अर्धशतकी खेळी करणारा किगन पिटरसनची झुंजार फलंदाजी
112-4 : उमेश यादवला अजून एक यश, दुसेन २१ धावा करुन बाद
100-3 : उपहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने पार केली शंभरी
45-3 : उमेश यादवही चार्ज झाला, २५ धावा करणाऱ्या केशव महाराजला धाडले तंबूत
17-2 : बुमराहने दिला आफ्रिकेला दुसरा धक्का, एडन मार्करमचा ८ धावांवर उडवला त्रिफळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.