पॅरिसमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे आणि इथे खेळाडू खेळ भावना जपत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, दुसरीकडे जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या जीवावर बेतेल अशी कृती रशियन बुद्धबळपटू ॲमिना ॲबाकारोव्हा ( Amina Abakarova ) हिने केली आणि ती कॅमेरात कैद झाली आहे. स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ॲमिनाने प्रतिस्पर्धी ओस्मानोव्हाला त्रास होईल अशी कृती केली. मिरर यूएसच्या वृत्तानुसार ॲबाकारोव्हाने कथितरित्या कबुली दिली की, प्रतिस्पर्धी खेळण्यासाठी बसलेल्या बोर्डवळ प्राणघातक पदार्थ टाकण्याचे हे पाऊल उचलले आहे.
स्पर्धा ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेरा फुटेजमुळे हा सर्व प्रकार उघड आला. त्यात असे दिसले की, ओस्मानोव्हा ज्या बोर्डजवळ बसली होती, तिथे मॅचदरम्यान तिला विषबाधा करण्याच्या उद्देशाने ॲबाकारोव्हाने प्राणघातक पदार्थ लावला. सामना सुरू असताना ओस्मानोव्हाने चक्कर आणि मळमळत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तपास सुरू झाला आणि हा प्रकार समोर आला.
दक्षिणी रशिया येथील Dagestan Chess Championship स्पर्धेत हा जीवघेणा प्रकार घडला. बुद्धिबळपटू ओस्मानोव्हाला तिच्या प्रतिस्पर्ध्याकडून विष देण्याचा प्रयत्न केला गेला. CCTV फुटेजमधून हा प्रकार उघडकीस आला. रशियन खेळाडूने तिच्या बॅगेतून काहीतरी काढले आणि नंतर प्रतिस्पर्धी बसते त्या बॉर्डवर तो द्रव्यरुपी पदार्थ लावला. प्रतिस्पर्धीला विष दिल्याच्या कारणास्तव ॲबाकारोव्हाला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. तिला आता कोणत्याही बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये खेळता येणार नाही. शिवाय तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
क्रीडा मंत्री, साझिदा साझिदोव्हा यांनी सांगितले की, या घटनेनंतर ॲबाकारोव्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तिच्यामुळे केवळ तिच्या प्रतिस्पर्ध्याचेच नव्हे तर स्वतःचे आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या इतर सर्वांचेही नुकसान होऊ शकले असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.