सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युध्दाकडे (Russia - Ukraine War) सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या दरम्यान क्रिडा विश्वाला देखील या युध्दाचा फटका बसत आहे. या परिस्थितीत 25 सप्टेंबर रोजी होणारी रशियन ग्रँड प्रिक्स (Russian Grand Prix) रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनमध्ये भयवाह परिस्थिती आहे. युक्रेनची राजधानी कीवच्या रस्त्यांवर युक्रेनियन सैन्याने रशियन आक्रमणकर्त्यांशी लढा देणे सुरु आहे. या दरम्यान गुरुवारी संध्याकाळी फॉर्म्युला 1 , FIA आणि संघांनी खेळाच्या स्थितीबद्दल चर्चा केली सर्वांसोबत झालेल्या या चर्चेनंतर सध्याच्या परिस्थितीत रशियन ग्रँड प्रिक्स आयोजित करणे शक्य नसल्याचे एका निवेदनातून सांगण्यात आले आहे. रशियन ग्रांप्री 25 सप्टेंबर रोजी सोची येथे होणार होती.
चेस ऑलिम्पियाड
इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE) कौन्सिलने निर्णय घेतला आहे की, 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड (44th Chess Olympiad) स्पर्धा, ज्यामध्ये अपंग खेळाडूंसाठीची स्पर्धा आणि FIDE काँग्रेस यांचा समावेश होतो त्या स्पर्धादेखील रशियामध्ये होणार नाहीत, अशी माहिती FIDE कडून जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.