Russian Tennis Player Andrey Rublev Wrote No War Please Message  esakal
क्रीडा

पुतिन यांना घरचा आहेर; रशियन टेनिसपटूने कॅमेऱ्यावर लिहिले...

अनिरुद्ध संकपाळ

दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत रशियाचा टेनिसपटू आंद्रे रूबलेव्हने (Andrey Rublev) फायनमध्ये प्रवेश केला. त्याने सेमी फायनलमध्ये पोलंडच्या हुबर्ट झुरकासेझचा 3-6, 7-5, 7-6(5) असा पराभव केला. या सामन्यानंतर त्याने रशियाच्या व्लामिदिर पुतिन (Vladimir Putin) सरकारला घरचा आहेर दिला. त्याने टीव्ही कॅमेऱ्यावर 'नो वॉर प्लीज' (No War Please) असा संदेश लिहिला. टेनिस स्पर्धांमध्ये सामन्यानंतर कॅमेऱ्यावर संदेश लिहिण्याची एक प्रथा आहे. त्या प्रथेनुसार आंद्रे रूबलेव्हने हा संदेश लिहिला. (Russian Tennis Player Andrey Rublev Wrote No War Please Message)

रशियान सैन्याने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine Crisis) केला होता. त्यानंतर आता ते युक्रेनची राजधानी कीव्हवर चाल करून जात आहेत. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी रशियाने बॉम्बवर्षाव वाढवला असून यात अनेकांचे प्राण जात आहेत. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे सैन्य देखील रशियाच्या आक्रमणाला कडवा प्रतिकार करत आहेत.

दरम्यान, रशियाचा दुसरा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) मॅक्सिको ओपन दरम्यान म्हणाला होता की, माझ्या देशाने युक्रेनवर हल्ला केला आहे या बातमीनेच मी जागा झालो. तो पुढे म्हणाला की, 'मॅक्सिकोत खेळत असताना घरातून ही बातमी बघणे सोपे नाही. एक टेनिसपटू म्हणून मी जगभरात शांततेचा पुरस्कार करतो. आम्ही विविध देशात खेळतो. या बातम्या ऐकणे सोपे नाही. मी शांततेचा पुरस्कर्ता आहे.'

मॅक्सिकन ओपनच्या (Maxican Open) सेमी फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालने (Rafael Nadal) रशियाच्या (Russia) डॅनिल मेदवेदेवचा (Daniil Medvedev) 6-3, 6-3 अशा दोन सेटमध्ये सहज पराभव करत फायनल गाठली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT