Ruturaj Gaikwad IND vs WI Team India Playing 11 esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : अखेर ऋतुराजला संधी मिळाली, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad IND vs WI Team India Playing 11 : भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात देखील संघातील प्रयोग बंद केलेले नाहीत. तिसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाने मोठा बदल केला असून आजच्या संघात हार्दिकने प्लेईंग 11 मध्ये दोन खेळाडूंचा समावेश केला.

फलंदाजीत ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली असून गोलंदाजीत जयदेव उनाडकटला संघात स्थान मिळाले आहे. ऋतुराज हा अक्षर पटेलच्या जागी संघात आला असून उमरान मलिकला संघाबाहेर ठेवत जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकॅडमी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारताने आपल्या संघात दोन बदल केले. अनेक सामने बेंचवर बसलेल्या ऋतुराज गायकवाडला खेळण्याची संधी देण्यात आली आहे आहे. तो अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात आला आहे.

दुसरा बदल म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला उमरान मलिकच्या ऐवजी संघात स्थान मिळाले आहे. गेल्या दोन वनडे सामन्यात उमरानला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

जरी टीम इंडियाने आपली सर्व बेंच स्ट्रेंथ या तीन वनडे सामन्यात वापरून पाहिली असली तरी याला युझवेंद्र चहल अपवाद ठरला. त्याला या मालिकेत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

भारताने आजच्या मालिकेचा विजेता ठरवणाऱ्या सामन्यात देखील भारताचे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांतीच देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची प्लेईंग 11 :

हार्दिक पांड्या, इशान किशन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, कुलदीप यादव.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT