क्रीडा

निवृत्तीची घोषणा केल्यावर वर्ल्ड कपमध्ये दिग्गज खेळाडूचा राडा! ठोकले तिसरे शतक अन् रोहित-विराट टाकले मागे

Kiran Mahanavar

South Africa Quinton De Kock Hits 3rd Century in World Cup : क्विंटन डी कॉकने वर्ल्ड कप 2023 च्या 23व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध शानदार शतक ठोकले. त्याने या एकदिवसीय वर्ल्ड कप मध्ये पाचव्या सामन्यात तिसरे शतक ठोकले आहे. ही कामगिरी करताच विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे गेला आहे. वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत 3 शतके करणारा डी कॉक हा पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक होते.

एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर क्विंटन डी कॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. स्पर्धेसाठी संघ जाहीर झाल्यानंतरच त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याने या वर्ल्ड कपची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध शतकाने केली, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत दूसरे शतक झळकावले. बांगलादेशविरुद्ध त्याने आज 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. या वर्ल्ड मधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

डी कॉकच्या शतकापूर्वी या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर होता. तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत आता डी कॉक पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने 5 सामन्यात 407 धावा केल्या आहेत.

विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामन्यात एकूण 354 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 118 च्या आसपास आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावण्यास तो चुकला होता.

रोहित शर्माने आतापर्यंत 5 सामन्यात एकूण 311 धावा केल्या आहेत. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध केवळ एकच शतक झळकावले आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 33 षटकार आणि 17 चौकार मारले आहेत. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT