SA vs IND 2nd ODI Rinku Singh or Rajat Patidar Who will replace Shreyas Iyer in second ODI team india playing 11 cricket news in marathi  eSakal
क्रीडा

SA vs IND 2nd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियात मोठा बदल; दिग्गज खेळाडू बाहेर, 'या' स्टार मिळणार संधी?

Kiran Mahanavar

SA vs IND 2nd ODI : अर्शदीप सिंग व आवेश खान यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकन संघावर दणदणीत विजय मिळवला. आता भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज (ता. १९) दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. याप्रसंगी भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरील. दक्षिण आफ्रिकन संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

विजयी झालेल्या संघात सहसा बदल करण्यात येत नाही, पण भारतीय संघात बदल होणार हे निश्‍चित आहे. श्रेयस अय्यर उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही. तो कसोटी संघाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी भारतीय संघात कोणत्या खेळाडूला संधी देण्यात येईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. रिंकू सिंग व रजत पाटीदार या दोन फलंदाजांमध्ये चुरस असणार आहे.

आयपीएलमधून नावारूपाला आलेल्या रिंकू याने दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेतही ठसा उमटवला. त्याचे तंत्र व संयम वाखाणण्याजोगा आहे. इंदोरच्या रजत याने २०२२ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते, पण दुखापतीमुळे त्याला सातत्याने संघाबाहेरच राहावे लागले. एका स्थानासाठी दोन खेळाडूंमध्ये रस्सीखेच असणार आहे.

ऋतुराज गायकवाड व साई सुदर्शन हे सलामीचे फलंदाज संघात कायम राहतील. ऋतुराजकडून गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी होत आहे. साईने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक झळकावून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. तिलक वर्मा, के. एल. राहुल व संजू सॅमसन हे मधल्या फळीतील फलंदाज संघात कायम असतील. रिंकू सिंगसाठी संजू सॅमसनला वगळण्यात येईल याची शक्यता कमी आहे.

यजमान संघातील फलंदाजांचा कस

यजमान दक्षिण आफ्रिकन संघातील फलंदाजांचा कस लागणार आहे. क्विंटॉन डी कॉक याने विश्‍वकरंडकानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे एडन मार्करम, रॅसी वॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर व हेनरिक क्लासेन या फलंदाजांवरील दबाव वाढला आहे. या सर्व खेळाडूंना आणखी जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे.

संभाव्य संघ :

  • भारत - के. एल. राहुल (कर्णधार व यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेशकुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, रिंकू सिंग, आकाश दीप, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर. (Team India)

  • दक्षिण आफ्रिका - एडन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी झोरझी, रिझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, वियान मुल्डर, आंदिल पेहलुकवायो, रॅसी वॅन डर ड्युसेन, तबरेझ शम्सी, लिझाड विलियम्स, काईल वेरेनी. (Team South Africa)

दुसरी एकदिवसीय लढत

  • भारत-दक्षिण आफ्रिका (IND - SA ODI)

  • दुपारी ४.३० वाजता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

Assembly Elections: विधानसभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT