South Africa Vs India 2nd Test Latest News 
क्रीडा

Sa vs Ind 2nd Test : भारताने दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका सोडवली बरोबरीत

South Africa Vs India 2nd Test Latest News |

Kiran Mahanavar

South Africa Vs India 2nd Test Day-2 : भारताने केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनी पराभव करत दोन कसोटी सामन्यांची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली. भारताने दुसऱ्या डावात आफ्रिकेने ठेवलेल्या 79 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने 28 तर कर्णधार रोहित शर्माने नाबाद 17 धावा केल्या.

44-1 : भारताला पहिला धक्का 

आक्रमक फटकेबाजी करत लवकरात लवकर 79 धावांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणारा यशस्वी जयस्वाल 23 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याला बर्गरने बाद केले.

भारताच्या पहिल्याच षटकात 11 धावा 

भारताने 79 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात 11 धावा केल्या. जीवनदान मिळालेल्या यशस्वी जयस्वालने दोन चौकार मारले.

भारतासमोर 79 धावांचे आव्हान 

भारताने दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावात संपवला. जसप्रीत बुमराहने 6 तर मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या. सिराज आणि प्रसिद्धने प्रत्येकी 1 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.

अखेर सिराज आला धावून 

एडिन माक्ररमने झुंजार शतक ठोकत आफ्रिकेची आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर मोहम्मद सिराजने माक्ररमला 106 धावांवर बाद केलं.

111-7  : बुमराहचा पंजा 

जसप्रीत बुमराहने केशव महाराजला 3 धावांवर बाद करत आपली पाचवी शिकार केली. याचबरोबर आफ्रिकेची अवस्था 7 बाद 111 धावा अशी केली.

103-6 : माक्ररमचे अर्धशतक तर बुमराहने दिला सहावा धक्का

सलामीवीर माक्ररमने झुंजार अर्धशतक ठोकले. माक्ररमच्या या खेळीमुळे आफ्रिकेने डावाने पराभव तरी टाळला. मात्र दुसऱ्या बाजूने जसप्रीत बुमराहने मार्को येनसेनला बाद करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला.

85-5 : बुमराहची तिसरी शिकार, आफ्रिकेचा निम्मा संघ गारद

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या उरलेल्या फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. त्याने आधी बेडिंगहॅमला चालतं केलं त्यानंतर वेरेनला 9 धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला.

Sa vs Ind 2nd Test live Day-2 : दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात बुमराहने दक्षिण आफ्रिकाला दिला मोठा धक्का!

जसप्रीत बुमराहने केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डेव्हिड बेडिंगहॅमला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. बेडिंगहॅमने 12 चेंडूत 11 धावा केल्या.

सध्या काइल वेरेयन हा एडन मार्करामसोबत क्रीझवर आहे.

पहिल्या दिवशी सामन्यात काय झालं?

एकंदरीतच न्यूलंडस् कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोनही बाजूच्या गोलंदाजांनी हुर्डा पार्टी केली असेच म्हणावे लागेल. न्यूलँडस् मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्‍या दिवशी फलंदाजीला चांगले असते, असा अनुभव असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा डीन एल्गरचा निर्णय थोडा धाडसी वाटला. भारतीय संघात दोन बदल करताना अश्विनच्या जागी जडेजा आणि शार्दुल ठाकूरच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळाली. सिराजने अगदी सुरुवातीला एडन मार्करमला बाद केले तेव्हा यशस्वी जयस्वालने खूप वेगवान झेल डावीकडे सूर मारत टिपला.

भारतीयांकडून दोनही बाजूंनी अचूक गोलंदाजी होत होती. नेहमीप्रमाणे अडखळत सुरुवात करणाऱ्‍या एल्गरच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर आदळला आणि सिराजने मोठा अडसर दूर केला.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सिराज-बुमरा जोडीने चांगलेच नाचवले. सिराजने इतका अचूक मारा केला, की फलंदाजांना त्याला तोंड देणे कठीण गेले. बुमराने फलंदाजांना सुरुवातीला बाद केले नसले तरी त्याने टिच्चून नेम धरून मारा केल्याने दडपण वाढत गेले. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. सिराजने भेदक मारा करताना ९ षटकांत १५ धावा देत ६ फलंदाजांना बाद केले. बुमरा आणि पदार्पण करणाऱ्‍या मुकेश कुमारने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करून सिराजला मस्त साथ दिली. २४ व्या षटकात उपाहाराअगोदर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव ५५ धावांवर संपला तेव्हा स्थानिक प्रेक्षक हादरले.

गोलंदाजांना तिखट मारा करताना बघून आनंद व्यक्त करणाऱ्‍या भारतीय फलंदाजांना आपलीही परीक्षा बघितली जाणार याची कल्पना होती. रबाडाने जयस्वालला शून्यावर बाद करून गंभीर इशारा दिला. संघाची गरज ओळखून कप्तान रोहित शर्माने झकास फलंदाजी केली. शुभमन गिलसह अर्धशतकी भागीदारी करून त्याने भारताचा डाव थोडा स्थिर केला. खेळपट्टीवरील छोट्या भेगांमुळे मधूनच चेंडू उसळी घेत होता ज्याची मनातून धास्ती फलंदाजांना वाटत होती. पायावर टाकलेल्या आणि आखूड टप्प्याच्या चेंडूंवर ७ चौकार मारून ३९ धावा करणारा रोहित शर्मा बर्गरला बाद झाला. बर्गरने त्याच जोमात पहिल्याच चेंडूवर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीला उगाच खुन्नस दिली. समोर गिल चांगली फलंदाजी करू लागला होता. रोहित शर्माप्रमाणेच गिल बर्गरला बाद झाला. दोनही वेळेला गली जागेवर उभ्या असलेल्या जेनसनने झेल पकडला. श्रेयस अय्यरला बर्गरने शून्यावर बाद करून भारताला अजून एक धक्का दिला.

विराट कोहलीने एव्हाना खेळपट्टीवर जम बसवला होता. त्याला अपेक्षित साथ राहुल देऊ लागला. संयमाने फलंदाजी करत राहुलने २२ चेंडूत पहिली धाव जमा करायला घेतली. पहिल्या ५ षटकांत ३० धावा दिलेल्या एन्गीडीने सहाव्या षटकात कलाटणी दिली. प्रथम ८ धावा जमा केल्यावर संयम सोडल्याने राहुलला तंबूत परतावे लागले. एन्गीडीने राहुलपाठोपाठ जडेजा आणि बुमराला बाद केले पुढच्या षटकात रबाडाला खेळताना विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT