Sa vs Ind 2nd Test : भारतीय संघानी 2024 या वर्षाची सुरुवात चांगली केली, परंतु तेथे स्वतःच लज्जास्पद कामगिरी केली आहे. केपटाऊनमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने प्रथम दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर ऑल आऊट केले. आणि नंतर स्वतःच 153 धावांवर ऑल आऊट झाले. लज्जास्पद बाब म्हणजे टीम इंडियाच्या शेवटच्या 6 विकेट एकही धाव न करता आऊट झाले.
टीम इंडियाच्या या शरणागतीवर सर्वत्र टीका होत आहे, कारण एकीकडे टीम इंडिया 200 धावांपर्यंत आघाडी घेईल असे वाटत होते, तर दुसरीकडे ही आघाडी केवळ 98 धावांवर थांबली. रोहित शर्माने भारतीय संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर भारतीय संघाची दुरवस्था झाली.
टीम इंडियाच्या पतनाची सुरुवात लुंगी नागिडीच्या ओव्हरने झाली, जेव्हा त्याने त्याच्या बाउन्सर बॉलवर केएल राहुलची विकेट घेतली. यानंतर टीम इंडियाचे काय झाले कुणास ठाऊक की पुढच्या 10 चेंडूत संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. केएल राहुलनंतर रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि विराट कोहलीही बाद झाले.
टीम इंडियाच्या अशा पडल्या विकेट-
1-17, यशस्वी जैस्वाल 2.1 षटके
2-72, रोहित शर्मा 14.2 षटके
3-105, शुभमन गिल 20.6 षटके
4-110, श्रेयस अय्यर 22.2 षटके
5-153, केएल राहुल 33.1 षटके
6-153, रवींद्र जडेजा 33.3 षटके
7-153, जसप्रीत बुमराह 33.5 षटके
8-153, विराट कोहली 34.2 षटके
9-153, मोहम्मद सिराज 34.4 षटके
10-153, प्रसिद्ध कृष्णा 34.5 षटके
दक्षिण आफ्रिकेसाठी या पहिल्या डावात कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आणि एक विकेट रनआउट म्हणून पडली. या डावात टीम इंडियाचे एकूण 7 फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत आणि शून्यावर बाद झाले. यामध्ये यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार यांचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव- 55/10, 23.2 षटके
भारत पहिला डाव- 153/10, 34.5 षटके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.