South Africa vs India Series sakal
क्रीडा

SA vs IND : ODI मालिकेच्या एक दिवस आधी टीम इंडियाला दुहेरी धक्का! दोन स्टार खेळाडू दौऱ्यातून बाहेर

टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे याआधी...

Kiran Mahanavar

South Africa vs India Series : टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. आता वनडे मालिका जिंकण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारताला धक्का बसला आहे. संघाचे स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि दुसरा मोहम्मद शमी हे दोघेही बाहेर गेले आहेत.

दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. तर शमी हा कसोटी संघाचा भाग होता, मात्र तो मालिकेतून बाहेर आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपध्ये शमीने शानदार गोलंदाजी केली होती. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता. यानंतर तो जखमी झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकणार नाही.

तर दीपक चहर कौटुंबिक कारणामुळे या दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले आहे. भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. चौथ्या सामन्यातही तो खेळला पण पाचव्या सामन्यात घरी गेला. त्यावेळी वडिलांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. याच कारणामुळे दीपक दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेला नाही.

दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतल्यानंतर निवड समितीने त्याच्या जागी आकाश दीपला वनडे संघात स्थान दिले आहे. बंगालचा आकाश आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. मात्र, शमीच्या बदलीबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT