Team India fans waving the flag  Sakal
क्रीडा

SA vs IND ... अन् स्टेडियमबाहेर दिमाखात फडकत होता तिरंगा!

सुशांत जाधव

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना बोलंड पार्क, पार्लच्या मैदानात Boland Park Paarl रंगला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा (Temba Bavuma) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जानेमन मलान (Janneman Malan) 6 , क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) 27 आणि एडम मार्करम (Aiden Markram) 4 धावा करुन तंबूत परतल्यानंतर बवुमानं दुसेनच्या साथीनं डाव सावरला. या जोडीनं (Temba Bavuma And Rassie van der Dussen) द्विशतकी भागीदारी केली.

आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवल्यानंतरही भारतीय गोलंदाजांचे खांदे पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मॅच दरम्यान एक आनंदी क्षण अनुभवायला मिळाला. पार्ल स्टेडियम बाहेर काही भारतीय चाहते राष्ट्रध्वज हाती घेऊन सामन्याचा आनंद घेताना दिसले. भारतीय चाहत्यांमधील क्रिकेट क्रेजचे दर्शनच त्यांनी या सीनमधून दाखवून दिले. बीसीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन भारतीय चाहत्यांचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येत आहे. कसोटीप्रमाणे वनडे मालिका पाहण्यासाठीही प्रेक्षकांना परवानगी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांनी संयुक्तपणे स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही प्रेक्षक स्टेडियमबाहेर येऊन सामन्याचा आनंद घेताना दिसले. भारतीय सामना पाहण्याची त्यांची उत्सुकताच यावेळी दिसून आली.

भारतीय संघाने सेंच्युरियन कसोटी सामना जिंकत दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात दमदार केली होती. मात्र जोहन्सबर्ग आणि केप टाऊन कसोटी सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी टीम इंडियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. या पराभवाची परतफेड करण्यासाठी टीम इंडिया वनडे मालिकेत प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. पहिल्यांदाच विराट कोहली धोनीशिवाय अन्य कोणत्यातरी कर्णधाराच्या अंडर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT