SA vs IND  Twitter
क्रीडा

टीम इंडियानं लंचमध्ये काय खाल्लं? मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल

सुशांत जाधव

SA vs IND : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानात रंगला आहे. पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरले. दुसऱ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना खेळाचा अस्वाद घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी एकही चेंडू फेकला गेला नाही. पावसाच्या चर्चेशिवाय भारतीय संघातील खेळाडूंनी लंच काय केला? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

भारतीय खेळाडूंच्या लंच मेन्यू (Team India's Lunch Menu) चा जो फोटो व्हायरल होतोय. यात ब्रोकली सूप (Brocolli Soup), चिकन चेत्तीनाद (Chicken Chettinad), दाल, लॅम्ब चॉप्स (Lamb Chops), पेपर सॉस (Pepper Sauce), व्हेजिटेबल कढाई (Vegetable Kadai) आणिपनीर टिक्का (Panner Tikka) या पदार्थांचा समावेश होता. भारतीय खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या पदार्थांची यादी पाहून अनेक क्रिकेट चाहते भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. लोकेश राहुलचे शतक आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकासह अजिंक्य रहाणेनं 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे नाबाद असून भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात फ्रंटफूटवर आहे. मयंक अग्रवाल (60), विराट कोहली (35) आणि पुजारा (0) धावांवर तंबूत परतले आहेत. विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करुन शतकी दुष्काळ संपवेल असे वाटले होते. पण पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फेल ठरला.

विराट कोहलीला चांगला स्टार्ट मिळाला होता. पण पुन्हा तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनिग्डी वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला छाप उटवता आली नाही. सर्वच्या सर्व तीन विकेट या एनिग्डीनं घेतल्याय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT