South Africa vs India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडेसाठी बीसीसीआयने (BCCI) 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे या दौऱ्यावर भारतीय संघाची धूरा ही लोकेश राहुलच्या (KL Rahul) खांद्यावर देण्यात आली आहे. ही गोष्ट फार नवल वाटणारी नाही. पण उपकर्णधार म्हणून जसप्रित बुमराहची ((Jasprit Bumrah) निवड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या युवा खेळाडूंना दुर्लक्षित करुन बुमराहकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
बीसीसीआय निवड समितीच्या नजीकच्या सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार बीसीसीयने एक मोठी चालच खेळली आहे. या चालीतून निवड समितीने रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना सूचक इशारा दिला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्य दाखवले नाही तर संघातील स्थान धोक्यात येईल आणि भविष्याच्या दृष्टीकोनातून टीम बांधणी करताना वेगळे पर्याय शोधले जाऊ शकतात, असाच काहीसा संकेत बीसीसीआय निवड समितीने युवा जोड गोळीला (Rishabh Pant And Shreyas Iyer) दिलाय.
बुमराहने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ज्या प्रकारे कामगिरीत सातत्य दाखवून दिले तसेच सातत्य पंत आणि अय्यरकडून अपेक्षित आहे. हा बदल केवळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावपूरता आहे. याचा एक अर्थ असा आहे की, घरच्या मैदानावर होणाऱ्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा कमबॅक केरल, हे निश्चत मानले जात आहे. रोहित शर्माने कमबॅक केल्यानंतर उप-कर्णधारपद पुन्हा लोकेश राहुलकडे येईल. सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बुमराहला कामगिरीतील सातत्यामुळे उपकर्णधार पदाची जबाबादीर सोपवण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणाची एक बाजू अशी आहे की, गेल्या काही दिवसांपासून रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यात शर्यत पाहायला मिळत आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यरनं दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद गमावले. त्यानंतर पंतकडे संघाची धुरा आली. अय्यर दुखापतीतून सावरल्यानंतही पंतलाच कायम ठेवण्यात आले. त्यामुळे भविष्यात या दोघांच्यातच चढाओढ दिसेल. जो दोघात भारी असेल तो आगामी कर्णधार पदाचा दावेदार असेल. किंवा कॅप्टन होऊ शकेल, याचे संकेतही बीसीसीआयला द्यायचे आहेत. त्याची छोटी झलकच बुमराहच्या निवडीतून दिसून येते, असे मानले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.