Rishabh Pant Sanju Samson : भारताच्या मुख्य संघात कोणता विकेटकिपर खेळवायचा हा विषय प्रत्येक संघनिवडीनंतर चर्चेला जातो. भारताची विकेटकिपर म्हणून सध्या तरी पहिली पसंती ही ऋषभ पंतला असते. मात्र संजू सॅमसन आणि इशान किशन हे देखील संधी मिळेल त्यावेळी चांगली कामगिरी करत आपली दावेदारी सादर करत असतात. दरम्यान, भारताचे माजी विकेटकिपर आणि माजी निवडसमिती अध्यक्ष साबा करीम यांनी या तीनही विकेटकिपर्स बद्दल आपले मत व्यक्त केले.
साबा करीम इंडिया न्यूज या वृत्तावाहिनीशी बोलताना म्हणाले की, 'मी अजूनही संजू सॅमसन आणि इशान किशनपेक्षा ऋषभ पंतला अधिक पसंती देईन. मला या दोघांमध्येही जो ऋषभ पंतमध्ये आहे तो X - फॅक्टर दिसत नाही. सॅमसन हा एक जबरदस्त स्ट्रोक प्लेअर फलंदाज आहे. मी त्याला टीम इंडियामध्ये एक फलंदाज म्हणून जागा देऊ शकतो. इशान किशनला संधी मिळाली मात्र त्याने त्याचा फायदा उचलला नाही. यामुळे तो बॅटिंग ऑर्डरमध्येही खालच्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळे ऋषभ पंतच माझी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटध्ये माझी पहिली पसंती असेल.'
संजू सॅमसन आणि इशान किशन सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत खेळत आहेत. दरम्यान, लखनौमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 9 धावांनी पराभव केला. या सामन्यात संजू सॅमसनने 86 धावांची झुंजार नाबाद खेळी केली होती. तर इशान किशनला 37 चेंडूत 20 धावाच करता आल्या होत्या. या मालिकेत भारताचा दुसऱ्या फळीचा संघ खेळत आहे.
मुख्य संघ टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. या संघात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांची निवड झाली आहे. भारतीय संघ टी 20 वर्ल्डकप 2022 मधला आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याने भारत आपले वर्ल्डकप अभियान सुरू करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.