Sachin Tendulkar Birthday Special: क्रिकेटचा देव.. मास्टर ब्लास्टर.. भारतरत्न आशा अनेक उपाध्यांनी गौरवला गेलेल्या खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन तेंडुलकर. आपल्या जबरदस्त खेळाने त्याने 24 वर्षे (1989-2013) क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवले आहे.
अशा सचिनचा आज 50 वा वाढदिवस. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या या वाटचालीत त्याची कायमच साथ दिली ती पत्नी अंजली यांनी. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया सचिन- अंजली यांची खास फिल्मी लव्हस्टोरी..
(sachin tendulkar birthday news sachin and anjali love story)
सचिन आणि अंजलीची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. सचिनने अंजलीला ऑगस्ट 1990 मध्ये मुंबई विमानतळावर पहिल्यांदा पाहिले. त्यावेळी तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता कारण कमी वयात कसोटी शतक करणारा दुसरा क्रिकेटर होता. त्यात अंजली आईला रिसिव्ह करण्यासाठी मैत्रिणीसोबत विमानतळावर आल्या होत्या.
तेव्हा तिच्या मैत्रिणीने म्हणजे अपर्णाने सचिनला ओळखले. आणि सचिनकडे बोट दाखवत त्याने अंजलीला सांगितले की, इंग्लंडमध्ये सेंच्युरी करणारा तो बग सचिन. हे ऐकताच अंजली ऑटोग्राफ घेण्यासाठी सचिनच्या मागे धावली. एका मुलीला त्याच्या मागे धावताना पाहून सचिनही लाजला.
अजित आणि नितीन हे दोघे भाऊ त्यांना विमानतळावर घ्यायला आले होते म्हणून तो शांतपणे त्याच्या गाडीत बसला .कुतूहलाने सचिनशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना अंजली आईला घ्यायला विसरली. अंजली ही गुजराती उद्योगपती आनंद मेहता आणि ब्रिटिश समाजसेविका अॅनाबेल मेहता यांची मुलगी आहे.
सचिनला पहिल्यांदा विमानतळावर पाहिल्यानंतर अंजलीला कसं ही बोलायचं आणि सचिनला भेटायचं होतं. मैत्रिणींच्या मदतीने तिने सचिनचा फोन नंबर काढला आणि बोलणे सुरू केले. अंजलीने फोन करून सचिनला सांगितले. मी तुला विमानतळावर पाहिले. यावर सचिन बोलला हो मी पण तुला पाहिले होते, तू माझ्या मागे धावत होतीस.
फोनवरील संभाषणातून सचिन आणि अंजली यांच्या मैत्रीचा पाया रचला गेला. अंजलीने एका मुलाखतीत सांगितले की, पत्रकार म्हणून सचिनला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. सचिनच्या कुटुंबीयांना याचा धक्का बसला. सचिनच्या आईने अंजलीला विचारले होते. 'तू खरंच पत्रकार आहेस का..?' खरे तर सचिनला चॉकलेट्स गिफ्ट करताना आईने पाहिले होते.
सचिनची लोकप्रियता वाढू लागली. अंजलीला शहरात कुठेही भेटणे योग्य नव्हते. अशा परिस्थितीत तो अंजलीला भेटण्यासाठी ग्रँट मेडिकल कॉलेज जेजे हॉस्पिटलला जाऊ लागला, जिथे अंजली डॉक्टर होण्याचे प्रशिक्षण घेत होती. बऱ्याचदा ते लोणावळ्यातील अंजलीच्या वडिलोपार्जित बंगल्यावरही दोघे भेटत असत.
सचिन लाजाळू स्वभावाचा असल्याने त्याने घरी काहीच सांगितले नाही. शेवटी अंजलीने पुढाकार घेत हे जुळवून आणले. सचिनच्या 21व्या वाढदिवसादिवशी दोघांची एंगेजमेंट झाली आणि एका वर्षानंतर 24 मे 1995 रोजी सचिन-अंजली लग्नाच्या बंधनात अडकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.