Sachin Tendulkar Cooking Skills Video Gone Viral  esakal
क्रीडा

Sachin Tendulkar : तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar VIDEO : भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. तो इंडिया लेजंड संघाचे नेतृत्व देखील करत आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या सचिनला पुन्हा एकदा पॅड घालून, बॅट हातात घेऊन फलंदाजी करताना पाहणे ही चाहत्यांसाठी परवणीच असते. त्यामुळेच सचिनचे लेजंड लीगमध्ये खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. मात्र आता सचिन तेंडुलकरचा एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकर लेजंड लीगदरम्यान बॅटिंग करण्यासाठी पॅड घालून तयार झाला होता. मात्र या व्हिडिओत सचिन तेंडुलकर पॅड घालून बॅटिंग नाही तर कुकिंग करताना दिसत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने 'फ्लिक असो वा फ्लिप ऑमलेट कायम परफेक्टच असलं पाहिजे.' असे कॅप्शन दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कुकिंगची देखील आवाड आहे.

सचिन तेंडुलकरने लेजंड लीगमधील इंडिया लेजंड आणि न्यूझीलंड लेजंड यांच्यात नुकताच एका सामना झाला. या सामन्याच्या पावसामुळे निकाल लागला नाही. सामन्यात फक्त 5.50 षटकेच टाकण्यात आली. न्यूझीलंड लेजंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

इंडिया लेजंड्सकडून नमन ओझा आणि सचिन तेंडुलकर ही जोडी सलामीला आली होती. नमन ओझा 15 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. तर सचिन तेंडुलकरने 13 चेंडूत 19 धावा केल्या. सुरेश रैनाने देखील नाबाद 9 धावा केल्या होत्या. भारताच्या 5.5 षटकात 1 बाद 49 धावा झाल्या असताना पावसामुळे खेळात व्यत्य आला. त्यानंतर काही सामना सुरू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT