Sachin Tendulkar esakal
क्रीडा

SA vs IND: सचिन तेंडुलकरचा भारतीय फलंदाजांना मोलाचा सल्ला

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सचिन तेंडुलकरचा भारतीय फलंदाजांना मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Tour Of South Africa) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे. पहिला सामना सेंच्युरियन पार्कवर होणार असून त्यासाठी टीम इंडिया (Team India) नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या रबाडा आणि एन्गिडीसारख्या तोफखान्याचा सामना करण्यासाठी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारतीय फलंदाजांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बॅक स्टेज विथ बोरिया या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाला की, 'मी काय एक गोष्ट सांगत असतो. फ्रंट फूट डिफेन्स (Front Foot Defence) हा अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळताना हाच फ्रंट फूट डिफेन्स कामी येणार आहे. पहिल्या 25 षटकात तुम्ही कशा प्राकारे फ्रंट फूटवर कसे खेळता यावर सर्व अवलंबून आहे.'

सचिन तेंडुलकरने याबाबत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचे उदारहण दिले. त्याने या दोघांना इंग्लंडमध्ये खेळताना देखील हाच सल्ला दिला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये यश मिळवताना हाच सल्ला अंमलात आणला होता. आता दक्षिण आफ्रिकेतही हाच सल्ला कामी येईल असे सचिन म्हणाला.

सचिन पुढे म्हणतो, 'आपण रोहित आणि राहुलला इंग्लंडमध्ये धावा करताना पाहिले आहे. ते एखाद्यावेळी चाचपडलेही मात्र ती फारशी गंभीर गोष्ट नाही. प्रत्येक फलंदाज चाचपडतो. गोलंदाज हे तेथे विकेट घेण्यासाठी गोलंदाजी करत असतात. त्यामुळे चाचपडे ठिक आहे. पण, ज्यावेळी तुमचा हात चेंडू खेळताना शरिरापासून बाजूला जाऊ लागतो त्यावेळी चेंडू तुमच्या बॅटची कडा घेऊन जाऊ शकतो.'

रोहित आणि राहुल (Rohit and Rahul) हे दोघे इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे भारतीय फलंदाज आहेत. हे दोघेही इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यामागचे कारण सचिन तेंडुलकरने सांगितले. तो म्हणाला की, हे दोघेही चेंडू आपल्या शरिराच्या जवळ खेळतात.

'हे दोघेही चांगली फलंदाजी करण्याचे कारण म्हणजे खेळताना त्यांचे हात शरिराच्या जवळ असतात. त्यामुळेच इंग्लंडमध्ये भारत सुरुवातीला चांगली भागीदारी रचू शकला. इंग्लंडमध्ये भारतीय सलामीवीरांनी जबरदस्त कामगिरी केली.' असे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला.

मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) नसणार आहे. भारतात कसोटी संघ सराव करत असताना रोहित शर्माचा मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेला मुकला. याच मालिकेत त्याला भारतीय कसोटी संघांचा उपकर्णधार केले होते. मात्र आता त्याच्या अनुपस्थिती केएल राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार असेल. रोहित शर्माची रिप्लेसमेंट म्हणून भारतीय अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळचा संघात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: नाईकांचा डाव फसला, मंदा म्हात्रेंचा अखेरच्या क्षणी विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT