Sachin Tendulkar Virat Kohli  esakal
क्रीडा

'विराट'काळात अजूनही सचिन तेंडुलकरचाच जलवा

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या रन मशिन विराट कोहलीचा (Virat Kohli) काळ सुरु आहे असे बोलले जाते. मात्र विराट कामगिरीच्या बोलबाल्यात देखील भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) जवला अजूनही अबाधित आहे. सचिन तेंडुलकर अजूनही जगभरातील सर्वात प्रशंसनीय खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Most Admired Sportsperson In The World)

या यादीत सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) शतकांचा विक्रम मोडण्याच्या शर्यतीत आग्रेसर असलेला भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सचिन पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहे. ही माहिती Goal.com या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. जगभरातील सर्वात प्रशंसनीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांची नावे आहेत.

ब्रिटीश मार्केट रिसर्च आणि डाटा अ‍ॅनालिटिक्स फर्म यूगोव्ह यांनी याबाबतचे सर्वेक्षण केले होते. या अभ्यासात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) हे जगातील सर्वात प्रशंसनीय व्यक्ती ठरले आहेत. या यादीत ओबामा यांच्यानंतर बील गेट्स (Bill Gates) आणि शि जिंगपिंग (Xi Jinping) यांचा समावेश आहे. (Most Admired person In The World)

जगभरातील सर्वात प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 8 व्या स्थानावर आहेत. तर बॉलीवूड स्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) 14 व्या तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 15 व्या स्थानावर आहेत. जगातील सर्वात प्रशंसनीय महिला म्हणून बराक ओबामा यांची पत्मी मिशेल ओबामा (Michelle Obama) या अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या पाठोपाठ अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या (Queen Elizabeth II) यांचा समावेश आहे. (Most Admired Women In The World)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT