सचिन तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियममधील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (दि. 1) पार पडले. यावेळी खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी सचिन सचिनच जयघोष देखील केला.
सचिन तेंडुलकरचा पुर्णाकृती पुतळा हा त्याचा आयकॉनिक शॉट खेळतानाचा असून तो वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळच उभारण्यात आला आहे. हा पुतळा प्रसिद्ध आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी तयार केला आहे.
सचिन तेंडुलकरने आपली दोन दशकांची देदिप्यमान कारकीर्द ही मुंबईच्या वानेखेडे स्टडियमवरच संपवली होती. त्याने 10 वर्षापूर्वी आपली शेवटची इनिंग त्याच्या होम ग्राऊंड वानखेडेवर खेळली होती.
सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अवावरणाचा आधीचा मुहूर्त हा त्याच्या वाढदिवसादिवशीचा होता. मात्र पुतळ्याला अजून फिनिशिंग टच देण्यात आला नसल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
सचिन तेंडुलकरने कसोटीत 15,921 तर वनडेमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिनने वर्ल्डकप जिंकल्यानंतर आपली वनडे संपवली होती. 2011 च्या वनडे वर्ल्डकपची फायनल देखील वानखेडे स्टेडियमवरच झाली होती.
त्यावेळी व्हिक्टरी परेडवेळी विराट कोहली आणि सुसूफ पठाणने सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेतले होते. तर सचिनच्या हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असल्याचे समाधान होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.