Maasai community Sachin Tendulkar esakal
क्रीडा

Maasai Community : गाईची पूजा अन् वाघाची शिकार... तेंडुलकरचा सन्मान करणाऱ्या मसाई समुदायाच्या अनोख्या प्रथा

अनिरुद्ध संकपाळ

Maasai community Sachin Tendulkar : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी केनियाच्या दौऱ्यावर होता. त्याने केनियामध्ये सह कुटुंब सह परिवार पर्यटनाचा आनंद लुटला. यावेळी त्याने मसाई मारा येथे देखील भेट दिली होती. यावेळी मसाई समुदायाने सचिन तेंडुलकरचा सन्मान केला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा सन्मान केल्याने मसाई समुदायाबद्दल जास्तच कुतूहल निर्माण झालं आहे. सचिन तेंडुलकरला गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्या या समुदायाच्या परंपरांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

योद्धे मसाई

मसाई सुमदाय हा आफ्रिकेच्या केनिया आणि टंजानियाच्या ग्रेट रिफ्ट व्हॅलीमध्ये राहतो. जवळपास 400 वर्षापूर्वी मसाई समुदाय या ठिकाणी येऊन वसला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा सुमदाय पूर्वी योद्ध्यांचा समुदाय होता. आज देखील या समुदायातील लोकं वाघाची शिकार करतात. मात्र वाघिणीला ते हात देखील लावत नाहीत. वाघाची शिकार करणे हा शौर्य आणि शक्तीचे प्रतिक मानले जाते.

गाईची पुजा

जवळपास 9 लाख लोकसंख्या असलेल्या मसाई समुदायाच्या लोकांमध्ये पाळीव प्राण्यांना फार महत्व आहे. ते गाईची पुजा करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची देवता अन्काईने गाईला दोरीच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवलं आहे. मसाई अद्वैतवादी आहेत. ते फक्त एन्काई नावाच्या देवतेची पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात गाईचे फार महत्व आहे.

ते गाईचे दूध सेवर करतात, गाईचे शेण घरात वापरले जाते. मसाई समुदाय लग्नात हुंड्डा म्हणून गाय देतात. ज्याच्याकडे जास्त गाई तो जास्त श्रीमंत म्हणून गणला जातो. जरी मसाई समुदाय गाईची पूजा करत असला तरी ते गाईचे मास देखील खातात.

मृतदेह ठेवतात उघड्यावर

या समुदायात सर्वात वयस्कर सदस्य निर्णय घेत असतात. या समुदायाची अन्न गोळा करण्याला प्राथमिकता असते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत प्रवास करत असतात. त्यांच्या पाळीव प्राण्यांना चारा मिळावा यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी भटकत असतात.

मसाई समाजात जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते मृतदेह दफन करत नाहीत किंवा अग्निही देत नाहीत. ते मृतदेहाला उघड्यावर सोडतात. मसाई समाज आपली वेगळी ओळख दर्शवण्यासाठी लाल रंगाचे कपडे घालतात. मसाई समुदायातील पूरूष हे प्राण्यांना चरायला नेतात तर महिला घर सांभाळतात.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT