SAFF Championship 2023 Sakal
क्रीडा

SAFF Championship 2023 : समन्वयामुळे अजिंक्यपदावर मोहोर; भारतीय प्रशिक्षक स्टिमॅक यांनी उलगडले यशाचे रहस्य

भारतीय फुटबॉल संघाने १८ जुलै रोजी आंतरखंडीय स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारतीय फुटबॉल संघाने १८ जुलै रोजी आंतरखंडीय स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली. आता ४ जुलै रोजी सॅफ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

१७ दिवसांच्या अंतरात भारतीय संघाने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी या देदीप्यमान कामगिरीचे रहस्य उलगडताना म्हटले की, सांघिक समन्वयामुळे आम्हाला जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करता आली.

इगोर स्टिमॅक याप्रसंगी म्हणाले, जेव्हा आम्हाला एकत्रितपणे काम करण्यासाठी वेळ दिला जातो. फुटबॉल या खेळाला साजेसे वातावरण तयार केले जाते. तेव्हा आमच्याकडून अव्वल दर्जाचा खेळ केला जातो. त्याचे परिणाम प्रत्यक्षात मैदानात दिसून येतात.

आम्ही खेळाचा आनंद घेतो. एकसंघ म्हणून यशस्वी होतो. आम्ही सर्वांनी मिळून अजिंक्यपदाच्या रूपात चांगल्या स्मृती तयार केल्या, अशा शब्दांत त्यांनी पुढे आपल्या भावना व्यक्त केल्या.

आम्हाला एकत्रितपणे काम करण्यासाठी वेळ दिला नसता तर इतकी छान कामगिरी झाली नसती आणि त्या अपयशाची जबाबदारी खेळाडूंनी व सपोर्ट स्टाफनी घेतली नसती, असे त्यांनी पुढे मनापासून सांगितले.

सॅफ स्पर्धेतील पारितोषिके

  • सर्वाधिक गोल- सुनील छेत्री (५)

  • महत्त्वपूर्ण खेळाडू- सुनील छेत्री

  • सर्वोत्तम गोलरक्षक- अनिसूर रहमान झिको (बांगलादेश)

  • फेअर प्ले संघ- नेपाळ

भारताने आंतरखंडीय व सॅफ या दोन स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली, पण यामुळे समाधानी राहून चालणार नाही. एएफसी आशियाई करंडक पुढल्या वर्षी (२०२४) जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेची तयारी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी या वर्षी डिसेंबर महिन्यात चार आठवड्यांचा सराव व्हायला हवा. यासाठी सूट मिळायला हवी.

- इगोर स्टिमॅक, मुख्य प्रशिक्षक, भारतीय फुटबॉल संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT