SAFF Championship India Vs Pakistan : बंगळुरू येथे SAFF Championship मधील भारत - पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 - 0 असा पराभव करत स्पर्धेची विजयी सुरूवात केली. भारताकडून सुनिल छेत्रीने तीन गोल केले तर उदंता सिंह कुमामने एक गोल केला. संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. सामन्याला वादाचे गालबोट देखील लागले.
सामन्याला सुरूवात झाल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर त्वेशाने आक्रमण केले. सुनिल छेत्रीने पाकिस्तानच्या गोलकिपरने केलेल्या गचाळ कामगिरीचा फायदा उचलत 10 व्या मिनिटालाच गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर भारताने बॉल पाकिस्तानच्या गोलपोस्टजवळच ठेवला. भारतीय स्ट्रायकर्सनी सातत्याने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. दरम्यान, 16 व्या मिनिटाला सुनिल छेत्रीला पेनाल्टी मारण्याची संधी मिळाली. ही संधी छेत्रीने वाया न घालवता भारताचा आणि स्वतःचा देखील दुसरा गोल केला.
दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने पहिली 30 मिनिटे आपल्या गोलपोस्टचा कसाबसा बचाव केला. मात्र 74 व्या मिनिटाला पुन्हा एकदा सुनिल छेत्रीला पेनाल्टीची ऐती संदी मिळाली. छेत्रीने ही संधी गोलमध्ये रूपांतरित करत भारताची आघाडी 3 - 0 अशी वाढवली. सुनिलच्या या हॅट्ट्रिकनंतर उदांता सिंह 81 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 4 - 0 अशी नेली. अखेरपर्यंत पाकिस्तान संघाला भारताची गोलपोस्ट भेदता आली नाही.
पाकिस्तानने भारताच्या गोलपोस्टच्या दिशेने 6 फटके मारले मात्र त्यातील एकही फटका ऑन टार्गेट नव्हता. संपूर्ण सामन्यात बॉल पजेशनमध्येरही पाकिस्तान फक्त 30 टक्क्यावरच राहिला. याउलट भारताने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर 23 वेळा आक्रमण केले. यातील 7 फटके ऑन टार्गेट होते. भारताने सामन्यात 484 पासेस दिले यातील 85 टक्के पासेस अचुक होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.