India squads for England T20Is and Australia Series 
क्रीडा

द.आफ्रिकेपाठोपाठ इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! BCCI ने 'या' खेळाडूंवर खेळला डाव

Kiran Mahanavar

India squads for England T20Is and Australia Series : 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पुरुष क्रिकेट भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासोबतच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे.

निवडकर्त्यांनी अवघ्या 24 तासांच्या कालावधीत 3 परदेशी संघांचा सामना करण्यासाठी भारतीय संघाची निवड केली. 30 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची निवड झाल्यानंतर, 1 डिसेंबर रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या जाणाऱ्या T20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी मालिकेसाठी भारताच्या 16 सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली.

भारतीय महिला क्रिकेट संघाला 6 ते 10 डिसेंबर दरम्यान इंग्लंडसोबत 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. 14 डिसेंबरपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडनंतर भारताला ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासोबत कसोटी खेळायची आहे, जी 21 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवली जाणार आहे.

या मालिकेसाठी प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघात श्रेयंका पाटील, सायका इशाक आणि मन्नत कश्यप या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. श्रेयंका पाटील आणि सायका इशाक या दोघांनाही डब्ल्यूपीएलमधील त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीस मिळाले आहे. श्रेयंका आणि मन्नतला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे डावखुरा फिरकीपटू सायका इशाकची टी-20 आणि कसोटी या दोन्ही संघांमध्ये निवड झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT