Ajit Agarkar  esakal
क्रीडा

Ajit Agarkar : एका निवडसमिती सदस्याचा पत्ता होणार कट, अजित आगरकर ठरणार कारण; BCCI ने मागवले अर्ज

BCCI Selection Committee : असा कोणता नियम आहे ज्यामुळे सलिल अंकोला यांचा पत्ता होणार कट?

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Selection Committee : बीसीसीआयने अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) नेतृत्वाखालील निवडसमितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून भारतीय पुरूष वरिष्ठ संघाच्या निवड समितीतील एका जागेसाठी अर्ज भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही एकमेव जागा सलिल अंकोला (Salil Ankola) यांच्या असल्याचं सांगितलं जात आहे.

अर्ज भरण्याची शेवटीची तारीख ही 25 जानेवारी आहे. यानंतर बीसीसीआय अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट करेल आणि प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या पदासाठी अर्ज करणारा अर्जदार हा क्रिकेटमधून पाच वर्षापूर्वी निवृत्त झाला असला पाहिजे. तसेच गेल्या पाच वर्षापासून कोणत्याही क्रिकेट समितीवर त्यानं काम केलेलं नसावं. अशा व्यक्तीलाच या पदासाठी अर्ज करता येणार आहे. याचबरोबर उमेदवाराने किमान 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

सध्याच्या निवडसमितीत अजित आगरकर, शिवनसुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी, सलिल अंकोला, श्रीधरण शरथ यांचा समावेश आहे. त्यातील सलिल अंकोला यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सलिल अंकोला यांच्या जागी नवा निवडसमिती सदस्य भरण्यामागं नवनियुक्त निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आहे.

अंकोला हे निवडसमितीत वेस्ट झोन विभागाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2020 पासून निवडसमितीत आहेत. दरम्यान 2023 मध्ये अजित आगरकरला निवसमिती अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. तो देखील वेस्ट झोनचेच प्रतिनिधित्व करतो. बीसीसीआयच्या नियमानुसार निवडसमितीत पाच झोनचे पाच निवडसमिती सदस्य असलायला हवेत. त्यामुळे आता सलिल अंकोला हे नॉर्थ झोनच्या निवडसमिती सदस्यासाठी आपली जागा सोडतील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT