धोनीच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या सलमान बट्टच्या मनात इंग्लंडला विश्वविजेता बनवणाऱ्या इयॉन मॉर्गनच्या कॅप्टन्सीबाबत प्रश्नचिन्ह आहे. इयोन मॉर्गनमध्ये (Eoin Morgan) नेतृत्वाचा गुणच दिसत नाही, असे तो म्हणालाय.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट्ट (Salman Butt) याने महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वशैलीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. क्रिकेटच्या मैदानात रणनिती आखण्यात धोनीला तोड नाही, असे मत सलमान बटने व्यक्त केले आहे. धोनीच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या सलमान बट्टच्या मनात इंग्लंडला विश्वविजेता बनवणाऱ्या इयॉन मॉर्गनच्या कॅप्टन्सीबाबत प्रश्नचिन्ह आहे. इयोन मॉर्गनमध्ये (Eoin Morgan) नेतृत्वाचा गुणच दिसत नाही, असे तो म्हणालाय.
सलमान बट्ट (Salman Butt) आपल्या यू-ट्यूब चॅनलवरुन क्रिकेट आणि क्रिकेटर्सवर भाष्य करत असतो. आपल्या या कार्यक्रमात त्याने फाफ डु प्लेसिसला महान फलंदाजांच्या पक्तींत बसवले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांचा वापर करुन घेण्यात इयॉन मॉर्गनची तारंबळ उडाली होती. त्याच्याकडे कोणताही मास्टर प्लॅन दिसला नाही, असे म्हणत त्याने इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वातील उणीव दाखवून दिली आहे. दुसरीकडे एम एस धोनी चांगल्या नेतृत्वाचा उत्तम नमुना वाटतो, असे सलमान बट्ट म्हणाला आहे.
यावेळी सलमान बट्टने (Salman Butt) रोहित शर्माच्या नेतृत्व गुणावरही भाष्य केले. आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माने आपल्यातील नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे. विराट कोहली तिन्ही प्रकारातील उत्तम फलंदाज आहे. त्याचे आकडे ते दर्शवतात. एवढेच नाही तर त्याच्या खेळीचा संघालाही फायदा होतो, असे सलमान बट्टने म्हटले आहे.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनकडे कोणतीही रणनिती नसते. इंग्लंडचा संघ 300 किंवा 350 धावा करुन प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान परतवून लावू शकतो. पण एखाद्या संघाला रोखण्यासाठी त्यांच्याकडे योग्य रणनितीचा अभाव आहे. कॅप्टन इयॉन मॉर्गनकडे कोणताही प्लॅन नसल्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी संघाला रोखता येत नाही, असा दावा सलमान बट्टने केलाय. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने वर्ल्ड कप जिंकला असला तरी आयपीएलमध्येही त्याचे नेतृत्व उघड्यावर पडले होते.
युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने दिनेश कार्तिकच्या खांद्यावरील धूरा इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर दिली होती. मागील हंगमात मॉर्गन नेतृत्वाची छाप सोडण्यात कुठेतरी कमी पडला. यंदाच्या हंगामातही त्याला फार काही करता आले नाही. सलमान बट्ट म्हणतोय त्याप्रमाणे मॉर्गनकडे कोणत्या प्लॅनशिवाय नेतृत्व करताना दिसले. त्याचा कोलकाता नाईट रायडर्सला फटकाही बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.