Sania Mirza Retirement : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने अधिकृतपणे व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही घोषणा केली आहे.
१६ जानेवारीपासून होणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही सानियाची शेवटची स्पर्धा असेल असे सानियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधी सानियाने १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर निवृत्त घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता तिने ऑस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्ती घेण्याचानिर्णय घेतला आहे.
'माझे आई-वडील आणि बहीण, माझे कुटुंब, माझे प्रशिक्षक, फिजिओ आणि चांगल्या आणि वाईट काळात माझ्या पाठीशी उभे राहिल्याचे म्हणत त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.
माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात तुम्ही सर्वांनी मला मदत केली आहे. हैद्राबादच्या या चिमुरडीला तुम्ही स्वप्न पाहण्याची हिंमत तर दिलीच पण ती स्वप्ने पूर्ण करण्यास मदत केल्याचे भावनिक उद्गार काझत तिने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
अशी आहे सानियाची कारकीर्द
टेनिस स्टार सानिया मिर्झाने दुहेरीत ३ वेळा चॅम्पियन मिळवले आहे. याशिवाय तिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. तसेच तिने महिला दुहेरीत २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
सानियाचे ग्रँड स्लॅम विजेतेपद
मिश्र दुहेरी - ऑस्ट्रेलियन ओपन (2009)
मिश्र दुहेरी - फ्रेंच ओपन (2012)
मिश्र दुहेरी - यूएस ओपन (2014)
महिला दुहेरी - विंबल्डन (2015)
महिला दुहेरी - यूएस ओपन (2015)
महिला दुहेरी - ऑस्ट्रेलियन ओपन (2015) 2016)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.