Sanjivani jadhav won gold medal esakal
क्रीडा

नाशिकच्या संजीवनीला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

अरूण मलाणी

नाशिक : वरंगल (तेलंगणा) येथे आयोजित केलेल्या साठाव्या खुल्या गटाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. स्पर्धेत दहा हजार मीटर गटातून धावताना नाशिकच्या संजीवनी जाधव हिने महाराष्ट्राला सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले. यापूर्वी याच स्पर्धेत तिने कांस्यपदकाची कमाई केली आहे.

वरंगल येथील राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी आपली छाप सोडली आहे. विशेषतः महिला गटातून नाशिकच्या धावपटूंनी महाराष्ट्राला आत्तापर्यंत एकूण चार पदके जिंकून दिली आहेत. महिलांच्या पाच हजार मीटर गटातून नाशिकच्या कोमल जगदाळे हिने रौप्य तर संजीवनी जाधव हिने कांस्यपदकाची कमाई केली होती. तसेच कोमलने या स्पर्धेत आणखी एक रौप्यपदक पटकावलेले आहे. त्यापाठोपाठ संजीवनी जाधव हिने दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होताना सुवर्णपदकाची कमाई केली. 34 मिनिटे 20.03 सेकंद अशी वेळ नोंदवताना तिने प्रथम क्रमांक पटकावला. या गटातून रेल्वेकडून सहभागी झालेल्या कविता यादव हिने 35 मिनिटे 57.46 सेकंद अशी वेळ नोंदवत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या ज्योतीने 36 मिनिटे 37.90 सेंकद वेळ नोंदवत तृतीय क्रमांकासह कास्य पदक पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha election 2024: महायुतीने ठाकरेंना डिवचले; जाहिरातीतून उडवली खिल्ली

Latest Maharashtra News Updates : जागा वाटपाचा तिढा सुटणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद

Salman Khan: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शार्प शूटरला अखेर मुंबईत आणले; जाणून घ्या कोण आहे सुक्खा कालूया?

Parivartan Mahashakti : तिसऱ्या आघाडीचे १५० जागांवर एकमत; पुण्यातील ‘परिवर्तन महाशक्ती’च्या बैठकीमध्ये निर्णय

Nashik Shootout Case : दीपक बडगुजरची पोलिसांसमोर गैरहजेरी; पोलिस न्यायालयात जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT