Sanju Samson Video : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. मात्र संघ जाहीर झाल्यापासून संजू सॅमसन सातत्याने चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर संजू सॅमसनच्या समर्थनात एक मोहीमच उघडली गेली आहे. नेटकरी सातत्याने ऋषभ पंत आणि केएल राहुलला ट्रोल करत आहेत. या दोघांच्या ऐवजी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान देण्यात येऊ शकते असं संजूच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. यावर आता संजू सॅमसनने एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना एक सुंदर संदेश दिला.
संजू सॅमसन या व्हिडिओत म्हणतो की, 'सध्या माध्यमात आणि सोशल मीडियावर चर्चा आहे की भारतीय संघात संजू चौथ्या क्रमांकावर कोणाच्या जागी येणार. संजू ऋषभ पंतची जागा घेणार की लोकेश राहुलची जागा घेणार. यावर माझा विचार स्पष्ट आहे. पंत आणि राहुल हे दोघेही माझ्याच संघाकडून खेळतात. जर मी माझ्या संघसहकाऱ्यांसोबत स्पर्धा करू लागलो तर मी माझ्या संघाचे देशाचेच नुकसान करणार.'
संजू व्हिडिओत पुढे म्हणतो की, 'मी स्वतःला भाग्यशाली समजतो की पाच वर्षानंतरही मी भारतीय संघात पुनरागन करू शकलो. भारतीय संघ पाच वर्षापूर्वीही नंबर वन होता आणि आताही जगातील नंबर वन संघ आहे. भारताच्या सर्वात चांगल्या 15 जणांमध्ये स्थान मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. याचबरोबर तुम्हाला स्वतःबाबतही विचार करावा लागतो. तुमची मानसिक स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही सकारात्मक विचार करायला हवा.'
जरी संजू सॅमसनला वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नसले तरी त्याला न्यूझीलंड अ संघाविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघाचे कर्णधारपद मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.