Sanju Samson Asia Cup  esakal
क्रीडा

Sanju Samson Asia Cup : आशिया कपच्या कॅम्पला संजू मुकणार; बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले महत्वाचे कारण

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson Asia Cup : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज संजू सॅमसन हा सध्या वेस्ट इंडीजमध्ये टी 20 मालिका खेळत आहे. त्यानंतर तो आयर्लंड दौऱ्यावर देखील जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये होणाऱ्या आशिया कप कॅम्पला मुकण्याती शक्यता आहे. हा कॅम्प 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होणापूर्वी संभाव्या भारतीय संघ आशिया कपची तायारी बंगळुरूमध्ये करणार आहे. जर संजू सॅमसन आशिया कपसाठी निवड झाली तरच तो शेवटच्या दोन दिवसांमध्ये संघाशी जोडला जाईल.

भारतीय संघ विंडीज दौऱ्यावरील पाच टी 20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आशिया कपसाठी तयारी करणार आहे. आशिया कप 30 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. संजू या संघाचा भाग आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार 'हा कॅम्प आशिया कपमध्ये खेळणाऱ्या संघासाठी आहे. जर तो संघात निवडला गेला तर त्याला कॅम्पच्या शेवटच्या दोन दिवसात रिपोर्ट करावे लागले.'

'आयर्लंड दौऱ्यानंतर संजू सॅमसनला ब्रेकची गरज असणार आहे. सध्या खूप कमी काळात सामने आणि प्रवास होत आहे. बुमराह हा दोन दिवसांच्या ब्रेकनंतर कॅम्पमध्ये दाखल होईल.'

संजू सॅमसनचे आशिया कपसाठीच्या संघात निवडले जाणे हे एक गुढ आहे. वनडेमध्ये केएल राहुल हा भारताचा पहिल्या पसंतीचा विकेटकिपर आहे. जर संजू सॅमसन मधल्या फळीतली एक आश्वासक फलंदाज म्हणून आपली जागा संघात निर्माण करू शकतो की नाही याच्यावर त्याची निवड अवलंबून आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT