Sanju Samson IPL 2023  esakal
क्रीडा

Sanju Samson : संजूचा आरंभ हैं प्रचंड... हंगामाची सुरूवात करावी तर सॅमसननेच!

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson IPL 2023 : आयपीएल 2023 च्या चौथ्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने सनराईजर्स हैदराबादची त्यांच्यात घरच्या मैदानावर चांगलीच अवस्था वाईट करून ठेवली. हैदराबादने राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मात्र राजस्थानच्या धडाक्यासमोर काळजीवाहू कर्णधार भुवनेश्वर कुमारला प्रथम फलंदाजी घेतली असती तर इतकी वाईट अवस्था झाली नसती असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण राजस्थानने पॉवर प्लेमध्येच 80 च्या वर धावा केल्या होत्या.

राजस्थानने 20 षटकात 5 बाद 203 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये जॉस बटलर (54), यशस्वी जैसवाल (54) आणि संजू सॅमसन (55) यांच्या अर्धशतकी खेळींचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे कर्णधार संजू सॅमसनने हंगामाच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत आपली सुरूवात दमदार करण्याची परंपरा कायम राखली.

संजू सॅमसनने 2020 पासून प्रत्येक हंगामाच्या पहिल्या सामन्यात मोठी खेळी केली आहे. त्याने 2020 च्या हंगामात 32 चेंडूत 74 धावांची खेळी केली. तर 2021 मध्ये 63 चेंडूत 119 धावांची शतकी खेळी केली होती. हाच कित्ता त्याने 2022 मध्येही गिरवत 27 चेंडूत 55 धावा केल्या. आता यंदाच्या 16 व्या हंगामात 32 चेंडूत 55 धावा ठोकल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test Series : ऋतुराज गायकवाड पर्थ कसोटीत सलामीला खेळणार? भारत अ संघाच्या २ फलंदाजांना BCCI थांबवणार

स्टार प्रवाहने केली आणखी एका नव्या मालिकेची घोषणा ; 'या' गाजलेल्या हिंदी मालिकेचा आहे रिमेक

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पांढरवाडी फाटा येथे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT