Sanju Samson esakal
क्रीडा

Sanju Samson : सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता... 'अनलकी' टॅग लागलेल्या संजूचा VIDEO व्हायरल

संजू सॅमसन अनलकी क्रिकेटरच्या टॅगबद्दलही बोलला

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson Talk About Rohit Sharma :

भारतातील वनडे वर्ल्डकप संपतो ना संपतो तोच ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत भारताची दुसरी फळी मैदानात उतरली आहे. वर्ल्डकप खेळणाऱ्या इतर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र या संघात संजू सॅमसनची निवड करण्यात आलेली नाही.

संजू सॅमसनला वेळोवेळी संधी मिळाली असून अनेकवेळा त्याने आपल्या कामगिरीने आपण संघात बसतो हे सिद्ध केलेलं आहे. मात्र कामगिरीत सातत्य नसल्याने त्याच्यावर कायम टांगती तलवार लटकत असते.

ज्या ज्यावेळी भारताचा संघ जाहीर होतो त्या त्यावेळी संजू सॅमसन ट्रेंड करत असतो. आता मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यानंतर तो ट्रेंड होऊ लागला आहे. याला कारण मात्र रोहित शर्माचं आहे.

संजू सॅमसनने (Sanju Samson) धानया वर्माला यूट्यूब चॅनलवर एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संजू सॅमसन भारताचा कर्णधार रोहित शर्माबद्दल तो भरभरून बोलला.

संजू व्हिडिओत म्हणतो. 'रोहित शर्मा हा माझ्याशी बोलण्यासाठी येणारा पहिला किंवा दुसरा व्यक्ती असेल. तो मला म्हणाला की, काय संजू कसा आहेस. तू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेस. मुंबई इंडियन्सविरूद्ध तू जास्तच षटकार मारतोस. तू चांगली फलंदाजी करत आहेस. रोहित भाईकडून मला चांगला सपोर्ट मिळतो.'

संजू सॅमसन या व्हिडिओत आपल्यावर लागलेला अनलकी टॅगबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, लोकं संजू सॅमसन हा सर्वात अनलकी क्रिकेटपटू आहे. मात्र मी कुठं अनलकी क्रिकेटर आहे. तुम्हीच असं म्हटलं तर कसं होणार? मी आता ज्या स्तरावर पोहचलो आहे. तेथे पोहचण्याचा मी विचार देखील केला नव्हता.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT