sarfaraz khan may return in India vs England 3rd test match rajkot cricket news in marathi  sakal
क्रीडा

Ind Vs Eng : श्रेयस अय्यरचा फ्लॉप शो, गिलच्या फिटनेसवर सस्पेन्स; सर्फराजची लागणार लॉटरी?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला, ज्यात इंग्लंडने बाजी मारली. तर दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, ज्यात भारताने विजय मिळवला.

पण या दोन्ही सामन्यांच्या 4 डावांमध्ये श्रेयस अय्यरच्या बॅटमधून विशेष कामगिरी पाहायला मिळाले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. अय्यर दीर्घकाळ संघासोबत आहे, मात्र त्याला चांगली कामगिरी करता येत नाही, त्यामुळे त्याचे संघातून बाहेर पडणे निश्चित मानले जात आहे.

या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. यासाठी अजून 10 दिवस आहे पण या सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11 कशी असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाने दुसरी कसोटी नक्कीच जिंकली असली तरी अनेक खेळाडूंची तंदुरुस्ती आणि अनुपस्थिती हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

विराट कोहलीच्या पुनरागमनाबद्दल अद्याप कोणतेही विशेष अपडेट मिळालेले नाही. श्रेयस अय्यरचा फॉर्म आता चिंता वाढवत आहे. दुसरीकडे, शुभमन गिलने शतक झळकावून काही चिंता कमी केल्या होत्या पण त्याला पण दुखापत झाली. अशा परिस्थितीत सर्फराज खानला संघात संधी मिळू शकते

भारतीय संघाने फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला होता. त्यामुळे आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर केला जाईल. सर्वप्रथम सर्फराज खान याचा भाग आहे की नाही हे पाहावे लागेल. जर त्याला संघात स्थान मिळाले तर तो राजकोट कसोटीत स्थान मिळवण्यास नक्कीच पात्र ठरेल, पण कर्णधार रोहित शर्मा त्याला संधी देतो की नाही हे पाहणे बाकी आहे.

विशाखापट्टणम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिलला दुखापत झाली आणि सामन्याच्या चौथ्या दिवशी तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात आला नाही. दुसरीकडे, अय्यरचीही कामगिरी चांगली नाही. अशा स्थितीत सर्फराज खानला तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.

शुभमन गिलच्या आधी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या दुखापतींशीही संघ झगडत आहे. हे दोन्ही खेळाडूही पुनरागमन करतील की नाही हे चित्र स्पष्ट नाही. म्हणजेच संघात कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही, कारण दुखापतींच्या समस्येने भारताला सर्व बाजूंनी घेरले आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनासोबतच कर्णधार आणि प्रशिक्षकाचीही चिंता वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT