Satwiksairaj Chirag Thailand Open : सात्विकराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टीने या भारतीय बॅडमिंटन जोडीने थायलंड ओपन पुरूष देहीरच्या अंतिम सामन्यात चीनची जोडी चॅन बो यँग आणि लियू यी चा पराभव केला. चिराग अन् सात्विकने चीनच्या जोडीचा 21-15, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभव करत आपला दबदबा पुन्हा एखदा सिद्ध केला. चिराग अन् सात्विकसाठी थायलंड हे एक खास ठिकाण आहे. त्यांनी त्यांचे पहिली सुपर 500 विजेतेपद थायलंडमध्येच 2019 ला जिंकले होते.
अंतिम सामन्यात भारतीय पुरूष जोडीने सामन्यावर सुरूवातीपासूनच पकड निर्माण केली होती. विशेष म्हणजे या संपूर्ण आठवड्यात या जोडीनं एकही गेम गमावलेला नव्हता.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने 2024 मधील आपले दुसरे वर्ल्ड टूर टायटल जिंकले. यापूर्वी त्यांनी मार्च महिन्यात फ्रेंच ओपन टायटल जिंकले होते. चिराग अन् सात्विकची ही यंदाच्या हंगामातील चौथी फायनल होती.
सात्विक - चिरागने 2019 च्या स्पर्धेत थरारक विजय मिळवला होता. आता या आठवड्यात मात्र त्यांनी थायलंडमध्ये सहज विजय मिळवले. त्यांनी यापूर्वीच्या जोड्यांचा एकही गेम न हरता पराभव केला. त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक 16 पाईंट्स विरोधी जोडीला घेऊ दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.