क्रीडा

Schoolympics 2023 : खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात उरुळी देवाच्या 'समता'ची तर मुलींच्या गटात सदाशिव पेठेतील 'रेणुका स्वरूप'ची बाजी

Kiran Mahanavar

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पुणे, ता. १३ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक खो-खो स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात उरुळी देवाची येथील समता विद्यालयाने तर मुलींच्या गटात सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप प्रशालेने जेतेपद मिळविले.

सिंहगड रोड येथील ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडा निकेतनच्या मैदानावर वरील स्पर्धा झाली. ईगल्स, पुणेचे प्रशिक्षक अविनाश पंढारी आणि ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडा निकेतनच्या प्राचार्या आरती बागकर यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.

मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात उरुळी देवाची येथील समता विद्यालयाने कोथरूडच्या सरस्वती विद्या मंदिरवर ९-७ असा रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक पटकाविले. सरस्वती विद्या मंदिरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ब्रॉँझ पदकाच्या लढतीमध्ये, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग संघाने एमईएस मुलांचे भावे हायस्कूल संघाचा १४-८ असा पराभव केला.

मुलींच्या गटात रेणुका स्वरूप हायस्कूल, सदाशिव पेठने कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलवर ८-४ अशी मात करत सुवर्ण पदक मिळविले. मिलेनियम नॅशनल स्कूलला रौप्यपदक मिळाले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात चिंचवडच्या अभिनव विद्यालयचा संघ उपस्थित न राहिल्यामुळे गुरुकुल विद्या मंदिर, बारामती रोडला ब्राँझपदक मिळाले.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत मुलींच्या गटात रेणुका स्वरूप स्कूलने गुरुकुल विद्या मंदिरवर ५-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलने चिंचवडच्या अभिषेक विद्यालयावर १४-१० अशी मात करत अंतिम फेरी गाठली.

मुलांच्या उपांत्य सामन्यात कोथरूडच्या सरस्वती विद्या मंदिरने सदाशिव पेठच्या एमईएस मुलांच्या भावे हायस्कूलचा १२-११ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात उरुळी कांचनच्या समता विद्यालयाने न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागवर १६-१० असा दमदार विजय मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT