Schoolympics 2023 sakal
क्रीडा

Schoolympics 2023 : मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत जयहिंद, स्प्रिंगडेलचा धावांचा यशस्वी पाठलाग

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी मुलींच्या गटात फलंदाजीने रंगत आणली. जयहिंद आणि सिंहगड स्प्रिंगडेल यांनी आव्हानात्मक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. जयहिंदने डीईएस सेकंडरीला, तर स्प्रिंगडेलने लोकसेवाला हरविले.

आज माही द्विवेदी, संजना सूर्यवंशी आणि स्वानंदी महाजन यांनी फलंदाजीचे कौशल्य दाखवून आपापल्या संघांना विजय मिळवून दिला. अमानोरा संघाने एंजल मिकी मिनी संघावर ३१ धावांनी मोठा विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

अमानोरा, हडपसर : ८ षटकांत १ बाद ८५ (माही द्विवेदी २३, आर्या शेवाळे नाबाद १५) ३१ धावांनी विवि एंजल मिकी मिनी, हडपसर : ८ षटकांत १ बाद ५४ (तेजस्विनी मोटे नाबाद १८, तन्वी कोंडे १०, माही द्विवेदी १-१५) सर्वोत्तम : माही द्विवेदी

डीईएस सेकंडरी : ८ षटकांत २ बाद ४६ (नूपुर धडपाळे नाबाद १२, ईश्वरी भंडारे नाबाद ६, शर्वरी खिलारी १-५) ७ विकेटनी पराभूत वि जयहिंद हायस्कूल : ६ षटकांत ३ बाद ४७ (संजना सूर्यवंशी २३, मुस्कान शेख ९, मुक्ता परमशेट्टी ३-१४)

सर्वोत्तम : संजना सूर्यवंशी

लोकसेवा, फुलगाव : ८ षटकांत ३ बाद ४३ (कांचन शिंगाडे १०, दीपाली दाते नाबाद ७, क्रिशा भिसे २-११, तनिष्का कुटे १-९) १० विकेटनी पराभूत वि सिंहगड स्प्रिंगडेल : ५.३ षटकांत बिनबाद ४४ (स्वानंदी महाजन २१, श्रावणी भुईंबर ८)

सर्वोत्तम : स्वानंदी महाजन

प्रतिक्रिया

लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. मला कुटुंबीयांनी खेळण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले. स्कूलिंपिकमुळे खेळायची संधी मिळाली. आजच्या सामन्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. या स्पर्धेसाठी आम्ही अनेक दिवसांपासून तयारी करत आहोत.

- संजना सूर्यवंशी, जयहिंद हायस्कूल

मी गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे .वडिलांनी मला खेळण्यासाठी कायम पाठबळ दिले. क्रिकेट ॲकॅडमीमध्ये मी सराव करते. शाळेतही आमचा सांघिक सराव सुरू असतो. मेहनत करून भारतीय संघात खेळायचे माझे स्वप्न आहे. महेंद्रसिंह धोनी आणि शुभमन गिल हे माझे आवडते खेळाडू आहेत.

- माही द्विवेदी, अमानोरा, हडपसर

मला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. शाळेत मी सहावीत असल्यापासून क्रिकेट खेळते आहे. शाळेच्या प्रत्येक स्पर्धेत मी भाग घेत असते. मला माझे क्रीडा शिक्षक खूप मदत करत असतात मला इंडियाच्या टीममध्ये खेळायची इच्छा आहे.

- स्वानंदी महाजन, सिंहगड स्प्रिंगडेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT