दहिवडी (सातारा) : ताश्कंद (उझबेकिस्तान Uzbekistan) येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या १८ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत भारतीय मुलींचा रग्बी संघ (Rugby Team) सहभागी होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची निवड चाचणी १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान होत असून, सराव शिबिरासाठी देशभरातून ५४ मुलींची निवड करण्यात आली आहे. त्यात सातारा जिल्हा रग्बी असोसिएशनच्या (Satara District Rugby Association) खेळाडू ऋतुजा वीरभद्र कावडे (Rutuja Kawade) व साक्षी नितीन जांभळे (Sakshi Jambhale) यांची निवड करण्यात आली आहे.
रग्बी खेळाची फारशी ओळख नसतानाही ऋतुजा व साक्षीने खडतर प्रवास करत आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखवली आहे.
रग्बी खेळाची सातारा जिल्ह्यात फारशी ओळख नसतानाही ऋतुजा व साक्षीने खडतर प्रवास करत आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखवली आहे. ऋतुजा ही माण तालुक्यातील शिंगणापूर गावची व साक्षी साताऱ्यातील आहे. जिल्हास्तरीय, विभागीय नंतर राज्य निवड चाचणी घेण्यात आली होती. सर्व चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे या दोघींची निवड करण्यात आली. भुवनेश्वर (ओडिशा) या ठिकाणी सराव शिबिर होणार आहे.
या खेळाडूंना शिव पाखरे, वैष्णवी शिंदे, मुराद पठाण, निकिता महामुलकर, आरती दुष्कर, मेघा बाबर या खेळाडूंनी मार्गदर्शन केले. दोन्ही खेळाडूंचे महाराष्ट्र रग्बी असोसिएशनचे सचिव श्री. नासिर, सहसचिव संदीप मोसमकर, सातारा जिल्हा रग्बी असोसिएशनचे सचिव अलंकार पवार, उपाध्यक्ष मनोज चव्हाण, कोरेगावचे श्री. भोसले यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.