Euro Cup 2024 : जर्मनीत सुरू असलेल्या युरो कप 2024 मध्ये एक मोठी घटना घडली आहे. सर्बियाच्या संघाने युरो कपमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. मंगळवारी क्रोएशिया आणि अल्बेनिया यांच्यात हॅमबर्ग येथे सामना झाला. हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.
मात्र या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील चाहत्यांनी तिसऱ्याच संघाबाबत घोषणाबाजी दिली. त्यांनी अँटी सर्बियन घोषणाबाजी केली. यामुळे चिडलेल्या सर्बियाच्या संघाने युरो कपमधूनच बाहेर पडण्याची धमकी दिली. सर्बियन फुटबॉल असोसिएशनने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करत अल्बेनियन पत्रकारावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. सर्बियाचा सामना स्लोवेनियासोबत होणार आहे.
सर्बिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव जोव्हान सुरबॅटोव्हिक यांनी सांगितले की, 'युरो कपमध्ये जे काही झालं ते एक विक्षोभक होतं. आम्ही युरोपियन फुटबॉल असोसिएशनला यावर कारवाई करण्याची मागणी करतोय. आम्ही स्पर्धेतून बाहेर देखील पडू शकतो.'
ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की दोषींवर कारवाई होईल. कारण त्यांनी आमच्या अल्बेनियाच्या पत्रकाराला स्पर्धेतून बाहेर काढण्याच्या आमच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही युरोपियन फुटॉबल फेडरेशनला दोन्ही फुटबॉल फेडरेशनवर कारवाई करण्याची मागणी करतोय. आम्हाला या प्रकरणात उडी घ्यायची नाही. मात्र जर युरोपियन फुटबॉल फेडरेशनने कारवाई केली नाही तर आम्हाला पुढं काय करायचं हे ठरवावं लागेल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.