Shafali Verma sakal
क्रीडा

Shafali Verma : विश्वचषकात शेफाली वर्मा करणार भारतीय महिला संघाचे नेतृत्व

वरिष्ठ संघात आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या हरियाणाच्या शेफाली वर्माच्या हाती मोठे जबाबदारी

Kiran Mahanavar

U19 Women's WC Shafali Verma : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वरिष्ठ संघात आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या हरियाणाच्या शेफाली वर्माची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 'अखिल भारतीय महिला निवड समितीने ICC अंडर-19 महिला विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'टी-20I मालिकेसाठी भारताच्या अंडर-19 महिला संघाची निवड केली आहे," असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

ICC अंडर-19 महिला विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत 16 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. भारताला ड गटात दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडसह स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील, जिथे संघांना सहा जणांच्या दोन गटात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील, जे 27 जानेवारीला पॉचेफस्ट्रूम येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे खेळले जातील. याच मैदानावर 29 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.

शेफाली दीर्घकाळापासून भारताकडून खेळत असून तिची कामगिरी चांगली चालु आहे. अशा स्थितीत त्याच्यासोबत खेळणे संघातील उर्वरित युवा खेळाडूंना खूप उपयुक्त ठरणार आहे. शेफालीशिवाय रिशा घोषनेही भारताच्या मुख्य संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. त्याचा पाठिंबा इतर खेळाडूंनाही खूप उपयुक्त ठरेल.

महिला अंडर-19 विश्वचषक प्रथमच आयोजित केला जात आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच भागात महिला विश्वचषकाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने


T20 विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेसाठी भारताचा अंडर-19 महिला संघ

  • शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोपड़ा, तीता साधु, फलक नाज, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री।

  • राखीव खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT