Shaheen Afridi : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील आजचा सामना हा बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. चिन्नास्वामीची खेळपट्टी ही कायम हाय स्कोरिंगच राहिली आहे. आजच्या सामन्यात देखील न्यूझीलंडने पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. पाकिस्तानी गोलंदाजांना मार खाण्याचे सर्व विक्रम मोडून टाकले.
शाहीन आणि हारिस राऊफ यांच्यात तर वर्ल्डकपमधील पाकिस्तानकडून सर्वात ऐतिहासिक मार कोण खातं याची जणू स्पर्धा लागली होती. हारिस राऊफने10 षटकात 1 बाद 85 धावा दिल्या होत्या. तो बरोबर 2 वाजून 21 मिनिटांनी पाकिस्तानचा वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज झाला होता.
मात्र शाहीन अफ्रिदीने बरोबर सतरा मिनिटांनी हा विक्रम मोडला. शाहीनने 10 षटकात एकही विकेट न घेता 90 धावा दिल्या. बरोबर 2 वाजून 38 मिनिटांनी शाहीनने हारिस राऊफचा पाकिस्तानचा वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज हा टॅग काढून घेतला.
पाकिस्तानच्या गोलंदाजांची ऐतिहासिक धुलाई
शाहीन अफ्रिदी - 10 - 0 - 90 - 0
हारिस राऊफ - 10 - 0 - 85 - 1
हसन अली - 10 - 0 - 82 - 1
रचिन रविंद्रच्या 108, केन विलियमसनच्या 95 तर ग्लेन फिलिप्सच्या 41 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरूद्ध 401 धावा चोपल्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने दमदार सुरूवात केली.
टीम सौदीने सलामीवीर अब्दुल्ला शफिकला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र फखर जमान आणि कर्णधार बाबर आझमने न्यूझीलंडने लादलेले कर्ज व्याजासकट परत करण्यास सुरूवात केली. या दोघांनी 20 व्या षटकातच पाकिस्तानला 150 च्या पार पोहचवले. जमानने 63 चेंडूत शतक ठोकले.
पाकिस्तानकडून वनडे वर्ल्डकपमध्ये ठोकण्यात आलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले. मात्र पाकिस्तान 21 षटकात 1 बाद 160 धावांवर पोहचली असताना पावसाने सुरूवात झाली. यामुळे सामना थांबवण्यात आळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.