क्रीडा

IND vs PAK Cricket : भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत आफ्रिदीचं मोठं विधान; म्हणाला, PM मोदींना…

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक दिवसांपासून कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. आता हे दोन संघ आयसीसी स्पर्धा किंवा आशियाई क्रिकेट काउंसीलच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. जेव्हा जेव्हा हे दोन संघ भिडतात तेव्हा स्टेडियम पॅक होतात. मात्र, राजकीय कारणांमुळे दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय सीरीज होत नाही.

दोन देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय सीरीज ही 2012-13 मध्ये खेळली गेली होती. तर दोन्ही संघांमधील शेवटचा सामना 2022 मध्ये टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध पूर्ववत होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटला परवानगी द्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोहामध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या निमित्तानं बोलताना आफ्रिदी म्हणाला की, 'मी मोदी साहेबांना विनंती करेन की दोन देशांदरम्यान क्रिकेट होऊ द्या.' यंदाच्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत, मात्र सामन्याचे भवितव्य हे स्पर्धेच्या आयोजन स्थळावरून ठरणार आहे.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

आशिया कपवरून वाद

या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे आयोजन त्यांच्या देशात करण्यावरून ठाम आहे. या प्रकरणावर बोलताना आफ्रिदी म्हणाला की बीसीसीआय हे खूप मजबूत बोर्ड आहे, परंतु त्यांनी 'शत्रू' बनवण्याचा प्रयत्न करू नये, तर 'मित्र' बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आफ्रिदी बीसीसीआयबद्दल बोलताना म्हणाला जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि तोच जर आपल्याशी बोलत नसेल तर आपण काय करू शकतो? बीसीसीआय हे खूप मजबूत बोर्ड आहे यात शंका नाही, पण जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. तुम्ही शत्रू बनवण्याचा प्रयत्न करू नका, तर तुम्हाला मित्र बनवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही जास्त मित्र बनवता तेव्हा तुम्ही मजबूत होतात.

पीसीबी कमकुवत नाही..

पीसीबी हा 'कमकुवत बोर्ड' आहे का, असे विचारले असता आफ्रिदी म्हणाला की, मला तसे वाटत नाही. मी कमकुवत म्हणणार नाही, पण समोरून (बीसीसीआय) देखील काही उत्तरे यावीत. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भारतीय खेळाडूंसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाकडून त्याला बॅट भेट म्हणून मिळाल्याचे आफ्रिदीने यावेळी उघड केले.

रैनाकडून आफ्रिदीला गिफ्ट

आफ्रिदीने यावेळी बोलताना सांगितलं की, भारतीय संघात माझे अजूनही मित्र आहेत, जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा खूप बोलतो. एलएलसी दरम्यान रैनाला भेटल्यावर मी त्याला बॅट मागितली. त्याने मला बॅटही दिली. याआधी आफ्रिदीने आशिया चषकाचे आयोजन करण्याबाबतही वक्तव्य केले होते. तो म्हणाला की, आशिया कपला कोण नाही म्हणत आहे? भारत नाही म्हणत आहे. आफ्रिदी पुढे म्हणाला की, जर भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा देश भारतीय संघाची खूप काळजी घेईल.

आफ्रिदी आशिया चषक आयोजनाबद्दल काय म्हणाला?

तुम्ही भारतीय संघ पाठवा तर, आम्ही त्यांना आमच्या डोक्यावर घेऊ. यापूर्वी मुंबईतील एका भारतीयाने मी त्याचे नाव घेणार नाही, त्याला भारतात येऊ देणार नाही, अशी धमकी पाकिस्तानला दिली होती. पण आम्ही सगळे बाजूला ठेवले आणि आमच्या सरकारने हे जबाबदारी म्हणून स्विकारलं आणि पाकिस्तानचा संघ भारतात गेला. म्हणूनच धमक्यांनी आमचे संबंध बिघडू नयेत. धोके कायम राहतील, असेही आफ्रिदी यावेळी म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT