Shakib Al Hasan BPL 2023 Nayak Film : बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने बांगलादेश प्रीमियर लीगच्या व्यवस्थापनावर कडक शब्दात टीका केली. विशेष म्हणजे शाकिबने यावेळी गाजलेला हिंदी चित्रपट नायकचे उदाहरण देत BPL च्या व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगली. शाकिबच्या टीकेचा रोख हा BPL इतर क्रिकेट लीगच्या शेड्यूलशी क्लॅश होत आहे याच्यावर होता.
इएसपीएल क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार शाकिब अल हसन बांगलादेश प्रिमीयर लीगच्या ड्राफ्टबद्दल आपले मत व्यक्त केले.
तो म्हणाला की, 'जर मला बांगलादेश प्रीमियर लीगचा सीईओ बनवण्यात आले तर मी 1 ते 2 महिन्यात सगळ्या गोष्टी सुरळीत करेन. तुम्ही नायक चित्रपट पाहिलाच असले? जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते तुम्ही एका दिवसातही करू शकता. मी खेळाडूंचा ड्राफ्ट आणि लिलाव वेळेवर करेन. बांगलादेश प्रीमियर लीग तेव्हाच ठेवेन ज्यावेळी रिकामा वेळ असेल. आपल्याकडे सध्या चांगली टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि आपण गोष्टी अजून चांगल्या प्रकारे करू शकतो.'
शाकिब BPL च्या मार्केटिंगबाबतही म्हणाला की, 'इथे कोणते मार्केट नाहीये कारण आपण कधी ते मार्केट तयारच केलं नाही. जर आपण मार्केंटिंगकडे थोडे जरी लक्ष दिले असते तर BPL आज खूप मोठं झालं असतं. या देशाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळलं जातं, अगदी छोट्या गावात देखील खेळलं जातं.'
'बांगलादेशची लोकसंख्या 16 ते 18 कोटी आहे. त्यात क्रिकेट हा खूप प्रसिद्ध खेळ आहे. त्यामुळे मी बांगलादेशात क्रिकेटला कोणते मार्केटच नाही असे म्हणणे मला मान्य नाही. मार्केटिंगच्या बाबतीत BPL हे एक अपयश आहे.'
शाकिबने बांगलादेश प्रीमियर लीगच्या बाबत काही नकारात्मक गोष्टी समोर ठेवल्या. BPL 2023, SA20 2023 आणि ILT20 या तीन मोठ्या लीग स्पर्धा एकाचवेळी सुरू होत आहेत. त्यामुळे दर्जेदार विदेशी खेळाडूंनी BPL 2023 कडे पाठ फिरवली आहे. जर कोणता खेळाडू या लीगमध्ये खेळला तरी तो एक ते दोन सामन्याच्यावर सामने खेळणार नाही.
हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.