Shakib al Hasan lead Bangladesh : आशिया कप 2023 च्या आधी बांगलादेशला एक नवा एकदिवसीय कर्णधार मिळाला आहे. शाकिब अल हसनची बांगलादेशच्या वनडे कर्णधारपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.
शाकिब अल हसन आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी तमीम इक्बालने राजीनामा दिल्यानंतर शकीब आता तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची धुरा सांभाळार आहे. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून त्याचा हा तिसरा कार्यकाळ असेल.
शाकिबने बांगलादेशसाठी महत्त्वाच्या वेळी पदभार स्वीकारला आहे. आशिया कपनंतर सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात वनडे मालिका होणार आहे. त्याआधी ते 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाणार आहेत. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी ढाका येथील निवासस्थानी ही घोषणा केली. ते म्हणाले की, "शकिब अल हसन आशिया कप, न्यूझीलंड मालिका आणि विश्वचषकासाठी कर्णधार आहे."
शाकिबने 2009 ते 2011 दरम्यान बांगलादेशचे 49 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले, जेव्हा तो पहिल्यांदा कर्णधार बनला, त्यापैकी 22 जिंकले. शाकिबने नंतर 2015 आणि 2017 मध्ये आणखी 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले. शकीबने आतापर्यंत 19 कसोटी आणि 39 टी-20 सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे आणि कर्णधार म्हणून 52 एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटचा सामना 2017 मध्ये होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.